Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क जायंट कंपनी ॲपलच्या (Apple) अनेक सेवा सोमवारी रात्री उशिरा ठप्प झाल्या, त्यानंतर जगभरातील युजर्स या सेवा वापर करू शकले नाहीत. ॲपलच्या सेवेवर जगाच्या अनेक भागांमध्ये परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ॲपलने आता ते दुरुस्त केले आहे.

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
Apple (प्रातिनिधिक फोटो) Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 8:37 AM

मुंबई : टेक जायंट कंपनी ॲपलच्या (Apple) अनेक सेवा सोमवारी रात्री उशिरा ठप्प झाल्या, त्यानंतर जगभरातील युजर्स या सेवा वापर करू शकले नाहीत. ॲपलच्या सेवेवर जगाच्या अनेक भागांमध्ये परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ॲपलने आता ते दुरुस्त केले आहे. ॲपल म्युझिक (Apple Music), ॲपल टीव्ही प्लस (Apple TV+), App Store, Podcasts, Contacts आणि Apple Arcade या कंपनीच्या वेब-आधारित सेवा आउटेजमुळे प्रभावित झाल्या होत्या. ॲपल सर्व्हिस अप-टाइम डॅशबोर्डनुसार, भारतातील युजर्सना iCloud चे काही फीचर्स वापरताना समस्या आल्या. भारतीय युजर्सना Apple Maps आणि Find My Network सारख्या सेवांमध्ये प्रवेश करणे कठीण जात होते, विशेषत: कॅलेंडर, कॉन्टॅक्ट्स आणि प्रायव्हेट Relay.जगाच्या विविध भागांमध्ये ॲपल युजर्सना समस्या येत होत्या. अनेक भागांमध्ये लोक सोशल मीडियावर ही माहिती शेअर करत आहेत. मात्र, ॲपलने या समस्येवर मात केली आहे, असा कंपनीचा दावा आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोमवारी झालेल्या नेटवर्क आउटेजचे निराकरण करण्यात आले आहे. Apple Music, iCloud आणि App Store ऑफलाइन झाले होते. आयफोन आणि अॅपलच्या इतर युजर्सशिवाय कॉर्पोरेट युजर्सनाही या आउटेजमुळे त्रास सहन करावा लागला आहे.

DNS ची समस्या

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, ॲपलने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, ही समस्या डोमेन नेम सिस्टम म्हणजेच DNS ची समस्या होती. जेव्हा इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस कनेक्ट होण्यात अयशस्वी होतो तेव्हा DNS फेल होण्याची समस्या उद्भवते. ॲपलच्या डॅशबोर्डनुसार, ग्राहकांव्यतिरिक्त कंपनीच्या अंतर्गत सेवेवरही परिणाम झाला आहे. वापरकर्त्यांना iCloud अकाऊंटमध्ये साइन-इन करताना समस्या येत होत्या, परंतु आता त्यांचे युजर्स सर्व सेवा सहजपणे वापरू शकतात.

इतर सर्व्हिसेस डाऊन

या आउटेजचा परिणाम iCloud Web Apps वर देखील झाला आहे. युजर्सना ‘ही सेवा स्लो आहे किंवा उपलब्ध नाही’ असे मेसेज मिळत होते. Apple युजर्सनी US वेळेनुसार दुपारी 12 वाजता सेवा बंद असल्याच्या तक्रारी सुरू केल्या. अॅपलच्या सेवांमध्ये या प्रकारची समस्या क्वचितच दिसून येते. मात्र, सोमवारी केवळ अॅपलच नव्हे तर अमेझॉनच्या सेवांबाबतही युजर्स तक्रारी करत होते.

इतर बातम्या

100 हून अधिक वॉच फेसेस, 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप, Truke Horizon Smartwatch बाजारात, किंमत…

Paytm Payments Bank भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला विकतेय? डेटा लीक्सच्या दाव्यांवर कंपनी म्हणते…

आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड, पाहा SMS द्वारे Aadhaar-Pan लिंक करण्याची सोपी पद्धत

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.