100 हून अधिक वॉच फेसेस, 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप, Truke Horizon Smartwatch बाजारात, किंमत…

ट्रूक (Truke) ही वायरेलस स्टिरिओज, वायरलेस हेडफोन्स, इयरफोन्स आणि साऊंड व्यावसायिक तसेच संगीततज्ञांसाठी उत्तम उपकरणे देणारी कंपनी आहे. भारतातील आघाडीच्या ऑडिओ ब्रॅण्डने 2999 रूपयांच्या किंमतीसह कस्टम-बिल्ट ट्रूक हॉरिझोन डब्ल्यू20 स्मार्टवॉच (Truke Horizon W20 Smartwatch) लाँच केलं आहे.

100 हून अधिक वॉच फेसेस, 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप, Truke Horizon Smartwatch बाजारात, किंमत...
Truke Horizon W20 smartwatch
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 5:04 PM

मुंबई : ट्रूक (Truke) ही वायरेलस स्टिरिओज, वायरलेस हेडफोन्स, इयरफोन्स आणि साऊंड व्यावसायिक तसेच संगीततज्ञांसाठी उत्तम उपकरणे देणारी कंपनी आहे. भारतातील आघाडीच्या ऑडिओ ब्रॅण्डने 2999 रूपयांच्या किंमतीसह कस्टम-बिल्ट ट्रूक हॉरिझोन डब्ल्यू20 स्मार्टवॉच (Truke Horizon W20 Smartwatch) लाँच केलं आहे. हॉरिझोन अॅडवेन्चर स्मार्टवॉचमध्ये (Adventure Smartwatch) बिल्ट-इन हाय-प्रीसिशन जीपीएससह ग्लोनास, डीप वॉटर रेसिस्टण्ससह आयपी68 रेटिंग, मल्टीपल-स्पोर्टस् मोड आणि जवळपास 168 तासांपर्यंत टिकणारी विशाल बॅटरी आहे. हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. या स्मार्टवॉचमध्ये 43 मिमी (1.69 इंच) टाइप फुल स्क्रीन टच एचडी कलर डिस्प्लेसह 240X280 पिक्सल्सचे रिझॉल्युशन आणि सुधारित कनेक्टीव्हीटीसाठी ब्ल्यूटूथ 5.0 आहे.

या स्मार्टवॉचमध्ये अनेक महत्त्वपूर्ण हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स देण्यात आले आहेत- जसे की 24X7 हार्ट-रेट सेन्सर, ब्लड प्रेशर मॉनिटर, ट्रू ब्लड ऑक्सिजन लेव्हल (एसपीओ2), पेडोमीटर आणि स्लीप मॉनिटर. बिल्ट-इन 9-अॅक्सिस ग्रॅव्हिटी सेन्सर तुम्हाला तुमच्या सर्व दैनंदिन कृतींची अचूकपणे नोंदणी करण्याची सुविधा देते. सुधारित कार्यक्षमतेसाठी 300 एमएएच क्षमतेची बॅटरी जवळपास 45 दिवसांपर्यंत स्टॅण्डबाय टाइम देते.

Truke Horizon Smartwatch मधील फीचर्स

बॅटरी जीपीएस फंक्शनशिवाय जवळपास 168 तासांपर्यंत आणि जीपीएस फंक्शनसह जवळपास 120 तासांपर्यंत कार्यरत राहते. बॅटरी पॉवर सेव्हिंग मोडसह जवळपास 14 दिवसांपर्यंत कार्यरत राहू शकते. स्मार्टवॉचमध्ये इतर सर्वोत्तम फीचर्समध्ये स्मार्ट नोटिफिकेशन्स, डीएनडी मोड, सेडेण्टरी रिमांइडर, वेदर अपडेट, म्युझिक कंट्रोल आणि प्रत्येक प्रसंगासाठी नवीन लुककरिता 100 हून अधिक क्लाऊड आधारित वॉच फेसेस आदींचा समावेश आहे.

ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज उपाध्याय म्हणाले, “भारतीय स्मार्टवॉच विभाग अपवादात्मक प्रमाणासह विकसित होत आहे आणि आम्ही या उदयोन्मुख विभागामध्ये प्रवेश करणे स्वाभाविक होते. आम्हाला दृढ विश्वास आहे की, आमचा दर्जात्मक अॅडवेन्चर स्मार्टवॉच रोमांचसाधक व आऊटडोअर उत्साहींसाबत तंत्रज्ञान व दर्जासंदर्भात तडजोड न करू पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील सुपरहिट ठरेल.”

इतर बातम्या

आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड, पाहा SMS द्वारे Aadhaar-Pan लिंक करण्याची सोपी पद्धत

Dell, MI, Samsung च्या उत्पादनांवर ग्राहकांचा विश्वास, विश्वसनीय ब्रँड्समध्ये Tata च्या 36 कंपन्या

मोबाइल डेटा राहील अधिक सुरक्षित! जाणून घ्या, व्हाट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अॅपचे टॉप सेफ्टी फीचर्स

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.