
तुम्ही कार खरेदी करता पण तुम्हाला या वाहन उद्योगांचा प्रवास आणि त्याबद्दलची माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता करू नका. आज आम्ही तिच माहिती तुम्हा लादेणार आहोत. वाहन कंपन्या शोरूममधून बाहेर पडून ई-कॉमर्स संकेतस्थळांपर्यंत कशा पोहोचल्या, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोच.
जगभरातील ऑटो कंपन्या सतत नवनवीन प्रयोग करत असतात. वाहनांचे डिझाइन, मॉडेल आणि सेफ्टी फीचर्सवर प्रयोग केले जात आहेत. यासोबतच कंपन्यांनी आपली मार्केट स्ट्रॅटेजीही बदलली आहे. कंपन्या केवळ उत्तम लूकसह नवीन कार आणि बाईक लाँच करत नाहीत. त्याऐवजी ते त्यांच्या विक्री आणि जाहिरातींवर बराच पैसा खर्च करत आहेत. याच अनुषंगाने कंपन्या शोरूममधून बाहेर पडून ई-कॉमर्स संकेतस्थळांवरही पोहोचल्या आहेत.
एकेकाळी लोक मोठ्या शहरातील आलिशान शोरूममध्ये कार खरेदी साठी जात असत, मग ऑटो कंपन्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्येही डीलरशिप देण्यास सुरुवात केली. त्याचा त्यांना फायदा झाला आणि लोकांपर्यंत त्यांची पोहोच वाढली.
आता डिजिटल युगात कंपन्यांनीही अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मकडे स्वत:ला वळवले आहे. कंपन्या येथे बाईक, कार विकताता आणि तुम्ही घरबसल्या स्कूटर आणि कार मागवू शकता.
आज, एक व्यक्ती आपला 24 तासांचा बहुतेक वेळ स्मार्टफोन आणि डिजिटल डिव्हाइस पाहण्यात घालवते. लोक रिल्स आणि वेबसाइट्सवर जास्त वेळ घालवतात. कंपन्यांनीही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यमाची निवड केली. यामुळे त्यांची प्रसिद्धीही वाढली आणि त्यांनी स्वत:ला ई-कॉमर्स वेबसाईटवरही आणले. आता लोक आपल्या उरलेल्या गरजा या संकेतस्थळांवरून विकत घेतात. तसे तर कार आणि स्कूटरही खरेदी केली जात आहे. सर्व वाहनांची माहितीही लोकांना ऑनलाइन मिळत आहे.
ऑनलाइन माध्यमातून कार, बाईक आणि स्कूटर मिळाल्याने लोक त्यांच्या किंमती आणि वैशिष्ट्यांची तुलना करू शकतात. यापूर्वी जेव्हा एखादी कार लाँच केली जात होती, तेव्हा त्याची माहिती देण्यास उशीर होत असे. पण आता लोकांना लाँच करण्यापूर्वी कारची माहिती मिळते. त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल अंदाज बांधले जात आहेत. किंमत श्रेणीचाही अंदाज आहे. याशिवाय कंपन्या आपल्या जाहिराती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. मुळात ई-कॉमर्सवर कार आल्याने लोकांना पूर्वीपेक्षा कमी खर्चात कार मिळत आहेत.