नव्या BH सीरिजसाठी कसा करावा अर्ज?, टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया जाणून घ्या

| Updated on: Aug 29, 2021 | 10:58 AM

परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे की, जर गाडीचा मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट झाला तर त्याला बीएच मार्क असलेल्या वाहनाची नवीन नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. यामुळे वाहनधारकांना अनेक फायदे मिळतील.

नव्या BH सीरिजसाठी कसा करावा अर्ज?, टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया जाणून घ्या
Follow us on

नवी दिल्लीः वाहनांचं झंझटीची ट्रान्सफर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक नवीन नोंदणी चिन्ह अर्थात भारत सीरिज-बीएच सीरिज सुरू केलीय. परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे की, जर गाडीचा मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट झाला तर त्याला बीएच मार्क असलेल्या वाहनाची नवीन नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. यामुळे वाहनधारकांना अनेक फायदे मिळतील.

नवीन वाहनांच्या नोंदणीसाठी नवी भारत सीरिज सुरू

वाहनांच्या नोंदणीसाठी आयटी आधारित उपाय या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन ट्रान्सफर करण्यासाठी वाहनांची पुन्हा नोंदणी करणे आवश्यक होते, जे खूप त्रासदायक काम होते. मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे नवीन वाहनांच्या नोंदणीसाठी नवी सीरिज भारत सीरिज सुरू केलीय.

…तर त्यांना अधिक लाभ मिळेल

BH सीरिजची नोंदणी ऐच्छिक आधारावर होईल. या अंतर्गत संरक्षण कर्मचारी, केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या किंवा 4 किंवा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या संस्थांना ही सुविधा ऐच्छिक आधारावर उपलब्ध असेल.

ही भारत सीरिज नोंदणी चिन्हाचे स्वरूप असेल

BH सीरिजचे नोंदणी चिन्ह असेल .. YYBh #### XX. YY म्हणजे पहिल्या नोंदणीचे वर्ष. BH भारत सीरिजसाठी कोड असेल. #### चार अंकी संख्या असेल आणि XX दोन अक्षरे असतील.

प्रवासी वाहन वापरकर्त्याला वाहनाची नोंदणी करण्यासाठी या टप्प्यांचे पालन करावे लागते.

टप्पा 1: दुसऱ्या राज्यात नवीन नोंदणी चिन्ह मिळवण्यासाठी वाहनधारकांना पहिल्या पालक राज्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक असेल.
टप्पा 2: नवीन राज्यात प्रो-राटा तत्त्वावर रस्ता कर भरल्यावर नवीन नोंदणी चिन्ह मिळेल.
टप्पा 3: तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला मूळ राज्यात रस्ता कराच्या परताव्यासाठी अर्ज दाखल करावा लागेल. मूळ राज्यातून परतावा मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे.

10 लाखांच्या वाहनावर 8% कर

बीएच सीरिज वाहनांच्या अंतर्गत नोंदणीसाठी शुल्क देखील निश्चित केले गेलेय. अधिसूचनेनुसार, BH सीरिजमधील 10 लाख रुपयांपर्यंतच्या वाहनांना 8% मोटार वाहन कर भरावा लागेल. 10 ते 20 लाखांच्या कारवर 10 टक्के, 20 लाख रुपयांच्या वरच्या कारवर 12 टक्के कर द्यावा लागेल. जर ते डिझेल वाहन असेल तर 2% अतिरिक्त कर भरावा लागेल. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2 टक्के कर भरावा लागेल. बीएच सीरिजअंतर्गत मोटार वाहन कर 2 किंवा 4, 6, 8 वर्षासाठी आकारला जाईल.

संबंधित बातम्या

गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ दिसणार, नव्या पॉलिसीचा ‘या’ वाहनधारकांना फायदा

गाड्यांबाबत मोदी सरकारची नवी पॉलिसी, ‘या’ लोकांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही

How to apply for a new BH series ?, Learn the process step by step