Driving License : ड्रायव्हिंग लायसन्सचा मोबाईल नंबर बदलायचाय? घरबसल्या एका क्लिकवर होईल काम

Driving License : आता तुम्ही आरटीओला न जाताही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर बदलू शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे.

Driving License : ड्रायव्हिंग लायसन्सचा मोबाईल नंबर बदलायचाय? घरबसल्या एका क्लिकवर होईल काम
Driving Livence Update
Image Credit source: Google
| Updated on: Jan 18, 2026 | 6:40 PM

भारतात गेल्या काही काळापासून अनेक महत्त्वाची कामे आता ऑनलाईन पद्धतीने करता येतात. याआधी आरटीओच्या संदर्भातील कामे करण्यासाठी ऑफिसला जावे लागत असे मात्र आता अनेक कामे घरी करता येणार आहेत. आता तुम्ही आरटीओला न जाताही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर बदलू शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. ही सुविधा सर्व राज्य परिवहन महामंडळांकडून दिली जाते. ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डची गरज लागणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा?

  • ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइट, parivahan.gov.in किंवा mParivahan अॅपला भेट द्या.
  • यानंतर होम पेजवरील माहिती सेवा विभागात जा.
  • त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल विभागावर क्लिक करा.
  • ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवांवर क्लिक करा.
  • इतर सेवा विभागात जा आणि तुमचे राज्य निवडा.
  • येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, यातील मोबाइल नंबर अपडेट करण्याचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर, तुम्हाला तुमच्या आधार कार्डची माहिती व्हेरिफाय करावी लागेल.
  • यानंतर, नवीन मोबाईल नंबर एंटर करा आणि अपडेट प्रक्रिया पूर्ण करा.

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी पैसे लागतात ?

जर तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये काही अपडेट करायचे असतील, तर तुम्हाला आरटीओ शुल्क भरावे लागेल, जे राज्यानुसार बदलू शकते. मोबाईल नंबर अपडेट होण्यासाठी किती वेळ लागेल? असा अनेकांना प्रश्न पडला असेल. यासाठी 24 तास ते 7 दिवसांचा कालावधी लागू शकता. मात्र हे राज्याच्या वाहतूक विभागाच्या नियमांवर अवलंबून असेल.

तुमचा मोबाईल नंबर अपडेट केल्याने तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स सेवांवर परिणाम होतो का?

ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर अपडेट केल्याने ड्रायव्हिंग लायसन्स सेवांवर परिणाम होणार नाही. हे फक्त तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा रेकॉर्ड डेटा अपडेट करण्यासाठी आहे. यामुळे फक्त नंबर बदलला जातो, इतर गोष्टी आहे तशाच राहतात.