AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki : मारुती कंपनीच्या या गाडीची जबरदस्त मागणी, आतापर्यंत 30 लाख युनिट्सची विक्री

Maruti Suzuki : मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्यांची भारतात जबरदस्त मागणी आहे. मारुती सुझुकीच्या एका गाडीनं गेल्या दोन दशकात कार प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. चला जाणून घेऊयात याबाबत..

Maruti Suzuki : मारुती कंपनीच्या या गाडीची जबरदस्त मागणी, आतापर्यंत 30 लाख युनिट्सची विक्री
मारुती सुझुकीच्या या गाडीचा भारतीय बाजारात बोलबाला, 30 लाख युनिट्सची विक्री
| Updated on: May 24, 2023 | 10:30 PM
Share

मुंबई : मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्यांना बाजारात जबरदस्त मागणी आहे. गेल्या काही वर्षात कंपनीने अनेक मैलाचे दगड गाठले आहेत. पण यात मारुती सुझुकीची फॅमिली कार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेगनआरची मागणी जबरदस्त आहे. गेल्या 24 वर्षांपासून या गाडीनं भारतीय कारप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मारुती सुझुकी वेगनआर गाडी पहिल्यांदा 1999 मध्ये सादर करण्यात आली होती.इतकी वर्षे उलटूनही कारवर प्रेम काही कमी झालेलं नाही. वर्ष 2022 मध्ये वेगनआर गाडीची भारतात सर्वाधिक विक्री झाली आहे. इतकंच काय या गाडीचे आतापर्यंत 30 लाख युनिट्स विकले गेले आहेत.

देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ख्याती असलेल्या मारुती सुझुकीने सांगितलं की, मागच्या दोन वर्षात वेगनआरच्या 30 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. 2008 मध्ये 5 लाख युनिट्स आकडा गाठला होता. त्यानंतर 2017 मध्ये 20 लाख युनिट्स टप्पा गाठला होता. तर 2021 मध्ये 25 लाख युनिट्सची विक्री झाली. 2021 ते आतापर्यंत आणखी पाच लाख गाड्यांची विक्री झाली असून 30 लाखांचा आकडा गाठला आहे.

मारुती सुझुकी वेगनआरपूर्वी मारुती 800 भारतातील मध्यमवर्गीयांची गाडी मानली जात होती. त्यानंतर या गाडीची जागा वेगनआरने घेतली. ही गाडी सँट्रोशी स्पर्धा करण्यासाठी बाजारात आणली होती. पण वेगनआरने सँट्रोला मागे टाकत भारतीयांच्या मनावर राज्य केलं.

पाचव्या पिढीतील HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित, मारुती सुझुकी वेगनआर इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) या सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

सध्या या गाडीचे भारतीय बाजारात दोन पेट्रोल इंजिन पर्यात आहेत. 1.0 लिटर आणि 1.2 लिटर क्षमता असलेलं पेट्रोल इंजिन आहे. यात हाय स्पीड मॅन्युअर ट्रान्समिशन गियर बॉक्स दिला आहे. दुसरीकडे यात सीएनजी व्हेरियंटदेखील आहे. या गाडीची किंमत भारतीय बाजारात 5.54 लाख ते 7.42 लाखांच्या मध्ये आहे.

इतकंच काय तर, मारुती सुझुकी वेगनआर ही देशातील सर्वाधिक चोरी होणारी कार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निळी वेगनआर कारही चोरीला गेली होती. पोलीस तपासानंतर ही गाडी गाझियाबादमधून ताब्यात घेण्यात आली.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.