5 लाखांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स, Hyundai ची छोटी SUV बाजारात धुमाकूळ घालणार?

| Updated on: Jun 01, 2021 | 3:49 PM

प्रत्येक मोठी कंपनी कॉम्पॅक्ट एसयूव्हींवर लक्ष केंद्रित करीत आहे, कारण ग्राहक आता या सेगमेंटकडे वळले आहेत. (Hyundai AX1 micro SUV)

5 लाखांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स, Hyundai ची छोटी SUV बाजारात धुमाकूळ घालणार?
Hyundai Mini Suv Ax1
Follow us on

मुंबई : कार खरेदी करण्याच्या बाबतीत भारतीय ग्राहकांची टेस्ट आता हळू हळू बदलत आहे. पूर्वी, भारतीय ग्राहकांना हॅचबॅक कार आवडत होत्या, आता मात्र ग्राहकांनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही पसंत करण्यास सुरवात केली आहे. आता प्रत्येक मोठी कंपनी कॉम्पॅक्ट एसयूव्हींवर लक्ष केंद्रित करीत आहे. वाहन कंपन्या आता कमी किंमतीत उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह अधिक शक्तिशाली वाहनं बाजारात सादर करत आहेत. अशा परिस्थितीत आता ह्युंदायनेही (Hyundai) लवकरच एक छोटी एसयूव्ही लाँच करण्याची घोषणा केली आहे. ह्युंदायच्या या मिनी एसयूव्हीला AX1 असे नाव दिले जाऊ शकते जे कोडनेम आहे. (Hyundai AX1 micro SUV spied in production guise, Know price, features)

ह्युंदायने आपल्या या वाहनाचा टीझर काही दिवसांपूर्वी जारी केला होता. यावेळी वाहनाच्या हेडलाइट्स आणि टेललाइट्स पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता या वाहनाचे काही फोटो लीक झाले आहेत. वाहनाच्या डिझाईनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही आणि या कारला पारंपारिक एसयूव्हीचा लूक देण्यात आला आहे. ही कार K1 प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे.

फीचर्स

या कारमध्ये 1.2 लीटर नॅचुरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन सध्या लोकप्रिय हॅचबॅक ग्रँड आय 10 मध्ये वापरले जात आहे. हे इंजिन 83PS ची शक्ती आणि 115Nm टॉर्क देते. त्यास 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन दिले जाऊ शकते. फीचर्सनुसार, मायक्रो एसयूव्ही एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स वाहनात दिल्या जातील.

या कारच्या आणखी काही फीचर्सविषयी सांगायचे तर हे वाहन मोठ्या टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टमसह येईल. वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कीलेस एन्ट्री, हाइट अॅडजस्टेबल सीट असे फीचर्स यामध्ये दिले जातील.

किंमत

या कारच्या इंटीरियरबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ह्युंदाय AX1 कधी लाँच केली जाईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु या कारची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते, असे म्हटले जात आहे. दरम्यान, ही कार 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीसह लाँच झाली तर भारतीय बाजारात ही कार अनेक मोठ्या कंपन्यांना जोरदार टक्कर देऊ शकते.

इतर बातम्या

Mahindra 9 शानदार SUV आणि MPV लाँच करणार, Scorpio, Bolero सह XUV 700 चा समावेश

धमाकेदार फीचर्ससह सर्वात स्वस्त मायक्रो SUV Tata HBX भारतात लाँच होणार

Wagon R EV : टोयोटाची इलेक्ट्रिक कार भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?

(Hyundai AX1 micro SUV spied in production guise, Know price, features)