धमाकेदार फीचर्ससह सर्वात स्वस्त मायक्रो SUV Tata HBX भारतात लाँच होणार

Tata Motors कंपनी मोस्ट अवेटेड HBX मायक्रो SUV लॉन्च करण्याची तयारी करत आहे, या कारची भारतात यापूर्वी कित्येक वेळा चाचणी घेण्यात आली आहे.

धमाकेदार फीचर्ससह सर्वात स्वस्त मायक्रो SUV Tata HBX भारतात लाँच होणार
Tata HBX

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी मोस्ट अवेटेड HBX मायक्रो SUV लॉन्च करण्याची तयारी करत आहे, या कारची भारतात यापूर्वी कित्येक वेळा चाचणी घेण्यात आली आहे. Tata HBX नुकतीच प्रोडक्शन अवतारामध्ये पाहायला मिळाली आहे, जी अ‍ॅलोय व्हील्स आणि प्रोडक्शन-स्पेक लाइटिंग सिस्टमसह सुसज्ज आहे. (cheapest micro SUV Tata HBX to be launched soon in India, check price and features)

या एसयूव्हीचं फ्रंट डिझाईन टाटा हॅरियरपासून प्रेरित आहे, ज्यात टॉपला स्लीक एलईडी डीआरएल (डेटाइम रनिंग लाइट्स) आणि बंपर्सवरील मुख्य हेडलॅम्प युनिट असलेला स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आहे. स्लीक एलईडी डीआरएल वरच्या ग्रिलमध्ये मर्ज्ड आहेत.

Tata HBX चं डिझाईन

अप्पर फ्रंट ग्रिल आणि डीआरएलसाठी एक क्रोम अंडरलायनिंग आहे, तर खालच्या ग्रिलमध्ये एक इन्व्हर्टेड ट्राय-एरो डिझाइन मिळेल. बम्परमध्ये फॉग लँप आणि डिटेल्ड एयर-इनटेक फीचर देण्यात आलं आहे. मायक्रो एसयूव्हीमध्ये ब्लॅक प्लास्टिकची क्लॅडिंग देण्यात आली आहे. बंपर बॉडी कलरने पेंट केलेलं नाही. प्रोडक्शनसाठी तयार असलेल्या टाटा एचबीएक्समध्ये ब्लॅक आउट पिलर आणि फ्लोटिंग रूफलाइन आहे. रूफ बॉडीच्या रंगात रंगवलेलं नाही. तथापि, मायक्रो एसयूव्हीमध्ये कॉन्ट्रास्टिंग शेड्स देखील असतील.

Tata HBX मध्ये काय असेल खास?

ही एसयूव्ही आधी पांढऱ्या रंगात पाहायला मिळाली होती. मायक्रो एसयूव्हीमध्ये मशीन-कट अ‍ॅलोय व्हील्स, एलईडी टेल-लाइट्स, सी-पिलर्सवर रियर डोर हँडल्स, ब्रेक लाइट्ससह रूफ-इंटिग्रेटेड स्पॉयलर, ब्लिंकर्ससह ओआरव्हीएम आणि इतर फिचर्स मिळतील.

Tata HBX चं प्रोडक्शन व्हर्जन तिच्या कॉन्सेप्टवर अखंड राहील. कारची लांबी 3,840 मिमी, रुंदी 1,822 मिमी, उंची 1,635 मिमी आणि व्हीलबेस 2,450 मिमी आहे. केबिन मूळ डिझाइन आणि फीचर्स टिकवून ठेवेल. यात फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, 3-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, ब्लॅक फॅब्रिक सीट्स, हर्मन ऑडिओ सिस्टम, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल, एम्बियंट लाइटिंग, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, एबीएस विथ एबीडी, कॉर्नरिंग स्टेबिलिटी कंट्रोल, पार्किंग सेन्सर समाविष्ट आहेत.

दमदार इंजिन

या एंट्री-लेव्हल एसयूव्हीला 1.2 लीटर 3 सिलेंडर नॅचुरली-एस्पिरेटेड इंजिन मिळेल जे Tiago आणि Altroz ला पॉवर देतं. हे इंजिन 86 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. हे 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह येऊ शकतं जे 100 bhp च्या जवळपास पॉवरसह येतं. ट्रांसमिशन पर्यायांमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

अवघ्या एका मिनिटात बॅटरी बदला, Gogoro Viva Electric Scooter भारतात लाँच होणार

(cheapest micro SUV Tata HBX to be launched soon in India, check price and features)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI