ह्युंदाईच्या फेसलिफ्ट i10 ची जोरदार चर्चा, नव्या फीचर्ससह गाडी आता स्वत:हून मारणार ब्रेक !

| Updated on: Feb 28, 2023 | 6:09 PM

2023 Hyundai i10 Facelift: कंपनीने ग्रँड आय 10 नियोस फेसलिफ्ट वर्जन लाँच केल्यानंतर आता प्रसिद्ध आय 10 फेसलिफ्ट वर्जन सादर केलं आहे. या गाडीत काही बदल करण्यात आले आहेत.

ह्युंदाईच्या फेसलिफ्ट i10 ची जोरदार चर्चा, नव्या फीचर्ससह गाडी आता स्वत:हून मारणार ब्रेक !
नव्या डिझाईनसह 2023 Hyundai i10 फेसलिफ्ट वर्जन लाँच, आता मिळणार हे नवे फीचर्स
Follow us on

मुंबई : ह्युंदाई मोटार बाजारात एकापेक्षा एक सरस मॉडेल सादर करत आहे. दुसरीकडे जुन्या मॉडेलमध्येही काळानुरूप बदल करत आहे. काही दिवसांपूर्वी ह्युंदाईने ग्रँड आय 10 निओएस फेसलिफ्ट वर्जन आरडीई कम्पॅटिबल इंजिनसह लाँच केलं होतं. आता कंपनीने आय 10 फेसलिफ्ट वर्जन सादर केलं आहे. नव्या हॅचबॅक कारमध्ये कॉस्मॅटिक बदल करण्यात आले आहेत. यात एक्स्टिरियर कलर थीम आणि जास्तीचे फीचर्स मिळणार आहेत. कंपनीने यासोबत छोट्या हॅचबॅक कारचं एन लाइन वर्जन देखील सादर केलं आहे. ग्रिलवरील हॉनिकॉम्ब शेप डीआरएसएसमधील फरक बघता क्षणीच तुमच्या लक्षात येईल. ग्रिल आणि लोअर बंपरची नवी शैली आणि टेललाईटवर एलईडी ग्राफिक्सची झलक दिसून येईल.

ह्युंदाई आय 10 हॅचबॅकमध्ये नवे अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. या गाडीच्या केबिनमध्ये काही फीचर्स अधिकचे दिले आहेत. यात एम्बियंट लायटिंग आणि नवा 4.2 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोसह 8 इंचाच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, रियरव्यू कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, फ्रंट आणि रियर युएसबी सी पोर्ट दिलं आहे. ही गाडी दोन एक्सटीरियर कलर्सस मेटा ब्लू आणि ल्युमेन ग्रेसह मिळेल. यात खास ADAS (ऑटोमॅटिक ड्रायव्हर असिस्ट सिस्टम) प्रणाली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये ह्युंदाई आय 10 चा सामना किया पिसान्टो आणि रेनॉल्ट क्विडशी असणार आहे.

गाडी स्वत:च ब्रेक मारणार

नव्या फेसलिफ्ट आय 10 मध्ये एडीएएस सिस्टम दिली आहे. या सिस्टममुळे फॉरवर्ड कोलिशन- अवॉयडेंस असिस्ट, हाय बीम असिस्ट, लेन कीप असिस्ट सिस्टम, ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग आणि इंटेलिजेंट स्पीड लिमिट वॉर्निंग या सुविधा मिळतील. ह्युंदाई आय 10 हॅचबॅक 2023 मॉडेल नव्या अलॉय व्हील्ससह मिळेल. या गाडीच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये 15 इंचाचे अलॉय व्हील आणि आय 10 एन लाइनमध्ये 16 इंचाचे अलॉय व्हील मिळतील.

इंजिनबद्दल सांगायचं तर, यात 1.0 लिटर तीन सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 66 एचपी पॉवर जनरेट करते. यात 1.2 लिटर चार सिलेंडर इंजिनदेखील आहे. हे इंजिन 83 एचपी पॉवर जनरेट करते आणि टर्बोचार्ज्ड 1.0 टीजीडी आय इंजिन 99 एचपी पॉवर जनरेट करते.