Tata Nexon EV ला टक्कर, Hyundai इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या डिटेल्स

| Updated on: Nov 10, 2021 | 9:25 AM

आगामी इलेक्ट्रिक कारबाबत नवीन माहिती समोर आली असून ही कार थेट टाटा नेक्सॉन ईव्हीशी स्पर्धा करेल. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर, Tata Nexon EV ची भारतीय ऑटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

Tata Nexon EV ला टक्कर, Hyundai इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या डिटेल्स
Hyundai Ioniq 5
Follow us on

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, त्यामुळे ग्राहकांनी त्यांचा मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेले नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. देशात इलेक्ट्रिक कारचा विभाग विस्तारत आहे. आता इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये, Hyundai आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे, ज्याला Hyundai Ionic 5 असे नाव दिले जाऊ शकते. ही कार इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक ईव्हीला टक्कर देईल. (Hyundai Ionic 5 Electric car ready to launch, will compete Tata Nexon EV)

आगामी इलेक्ट्रिक कारबाबत नवीन माहिती समोर आली असून ही कार थेट टाटा नेक्सॉन ईव्हीशी स्पर्धा करेल. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर, Tata Nexon EV ची भारतीय ऑटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आता या कारला टक्कर देण्यासाठी Hyundai स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या कारची बॅटरी रेंजही चांगली असेल. Hyundai Ionic 5 एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये येईल.

सिंगल चार्जमध्ये 220 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी Hyundai इलेक्ट्रिक कार एका लहान बॅटरी पॅकसह ऑफर केली जाईल, ही बॅटरी सिंगल चार्जवर 200 ते 220 किमी पर्यंतची रेंज देईल. आत्तापर्यंत समोर आलेल्या फोटोंवर विश्वास ठेवला तर हुंडईची पुढची इलेक्ट्रिक कार लूक आणि फीचर्सच्या बाबतीत दमदार असेल. त्याच वेळी, आकाराच्या बाबतीत, ही कार Nexon EV पेक्षा लहान असू शकते.

EV सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांची एंट्री

आगामी काळात भारतात बजेट इलेक्ट्रिक कारची मागणी मोठी असणार आहे. टाटा मोटर्स आणि ह्युंडई सोबतच इतर कंपन्या या सेगमेंटमध्ये आपला हात आजमावतील. येणारा काळ इलेक्ट्रिक कारचा आहे आणि सर्व कंपन्या त्यासाठी तयारी करत आहेत.

कारशिवाय अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्सही भारतीय ऑटो मार्केटमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहेत. तसेच अलीकडेच एक इलेक्ट्रिक बाईक देखील सादर करण्यात आली, तिचे नाव Revolt RV400 आहे आणि तिची सुरुवातीची किंमत 90,799 रुपये एक्स-शोरूम आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Hyundai Ionic 5 Electric car ready to launch, will compete Tata Nexon EV)