दसरा, धनत्रयोदशी अन् दिवाळीच्या दिवशी ‘या’ 5 चुका केल्या, तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द

| Updated on: Oct 11, 2021 | 11:20 PM

नवीन मोटार वाहन कायदा 2019 चे नियम, दंडाची रक्कम, चालान याबाबत बरेच बदल करण्यात आलेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी नवीन मोटर कायद्यात ठोस तरतुदी करण्यात आल्या. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंड कडक करण्यात आला असून, ड्रायव्हिंग लायसन्स (DL) यासह RC आणि मोटर इन्शुरन्स यांसारख्या नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आलेत.

दसरा, धनत्रयोदशी अन् दिवाळीच्या दिवशी या 5 चुका केल्या, तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द
Driving Licence
Follow us on

नवी दिल्ली : यंदा सणासुदीच्या काळात धोकादायक ड्रायव्हिंग किंवा वाहतुकीचे नियम मोडणे तुम्हाला अधिक महागात पडणार आहे. विशेषतः 2 नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या दिवशी आणि 4 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी तुम्ही रस्त्यावर काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे. कारण देशात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा कित्येक पटीने अधिक झालीय.

अपघात टाळण्यासाठी नवीन मोटर कायद्यात ठोस तरतुदी

नवीन मोटार वाहन कायदा 2019 चे नियम, दंडाची रक्कम, चालान याबाबत बरेच बदल करण्यात आलेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी नवीन मोटर कायद्यात ठोस तरतुदी करण्यात आल्या. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंड कडक करण्यात आला असून, ड्रायव्हिंग लायसन्स (DL) यासह RC आणि मोटर इन्शुरन्स यांसारख्या नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आलेत.

छोटीशी चूकही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी पुरेशी

या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर तुमची एक छोटीशी चूकही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी पुरेशी असेल. त्यामुळे वाहन चालवताना या पाच गोष्टी विशेष ध्यानात ठेवाव्या लागतात. धोकादायक पद्धतीने किंवा अल्कोहोलच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यास भारी दंड आकारला जातो.

ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर वाहन चालवू नका

पूर्वी लोक ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतरही वाहन चालवत होते, पण आता यासाठी नियम कडक करण्यात आलेत. त्याचप्रमाणे वाहनाच्या प्रदूषण प्रमाणपत्रासारखी कागदपत्रेही पूर्वीच्या तुलनेत अद्ययावत ठेवली जात आहेत. चालकांच्या सतर्कतेमुळे रस्ते अपघातही कमी झालेत. तरीही हेल्मेट नसलेल्या चालकांची संख्या अजूनही जास्त आहे.

तुमचा ड्रायव्हिंग लायसन्सदेखील अशा प्रकारे होणार रद्द

नवीन नियमांनुसार, पोलीस किंवा वाहतूक अधिकाऱ्यासोबत वाईट वागणूक, वाहन न थांबवणे, ट्रकच्या केबिनमध्ये बसणे हे वाईट वर्तन मानले जाते. तसे आढळल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द केले जाऊ शकते. तसेच दंड आकारला जाऊ शकतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या नवीन नियमांनुसार, बसमध्ये जादा चढणे, प्रवाशासोबत गैरवर्तन करणे, स्टॉपवर न उतरणे, बस चालवताना धूम्रपान करणे, दारू पिऊन गाडी चालवणे, अनावश्यक वाहन चालवणे, बसमध्ये सिगारेट आणि मद्यपान आता ड्रायव्हरला महागात पडेल. नवीन वाहन कायद्यात कागदपत्रे नेण्याच्या त्रासापासून सुटका झाली आहे. नवीन नियमांनुसार, वाहतूक पोलीस आणि आरटीओला दंडाची रक्कम आणि पोर्टलवर चालकांवर केलेल्या कारवाईची नोंद करणेदेखील बंधनकारक करण्यात आलेय.

संबंधित बातम्या

मारुती सुझुकी अर्टिगासारखीच 7 सीटर टोयोटा रुमियन ‘या’ देशाच्या बाजारात दाखल, ही आहे खासियत

अवघ्या 1.2 लाखात घरी न्या Maruti WagonR, झिरो डाउनपेमेंटसह स्पेशल ऑफर