एखाद्या बंकरपेक्षा कमी नाही पीएम मोदींची ‘ही’ कार…तटबंदीला भेदणे अशक्य

| Updated on: Jun 25, 2022 | 12:34 PM

सिक्योरिटी अपडेटनंतर या कारची किंमत 12 कोटी रुपयांपर्यंत सांगण्यात येत आहे. या कारची चाकेदेखील पंक्चरप्रूफ असल्याचे सांगण्यात आले आहे. या शिवाय फ्यूअल टँकवर एक प्रकारचे स्पेशल मटेरियलचे कोटींग करण्यात आले आहे. इंधनाच्या टाकीला होल पडल्यावर मटेरियलच्या माध्यमातून ते होल आपोआप भरण्यास मदत होत असते.

एखाद्या बंकरपेक्षा कमी नाही पीएम मोदींची ‘ही’ कार...तटबंदीला भेदणे अशक्य
Image Credit source: unsplash.com
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशातील एक अतिशय महत्वाचे नेते आहेत. आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक मुत्सद्दी धोरणे राबवून जगात देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारताचे पंतप्रधान असल्यामुळे त्याच्या सुरक्षेला डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारकडून त्यांच्यासाठी कडेकोट तटबंदी केलेली आहे. या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) वर सोपविण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेला समोर ठेवून एसपीजीने मागील वर्षी नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज मेबँक एस650 गार्डला (Mercedes Maybech S650 guard) दाखल केले आहे. या कारला सर्वात आधी मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या भेटी दरम्यान, हैदराबाद हाउसमध्ये पाहण्यात आले होते. ही कार जगातील सर्वाधिक सुरक्षीत कारपेकी एक मानली जाते. ही कार बंदुकीतील गोळ्यांचा वर्षाव तसेच बाँम्ब स्पोटापासून वाचण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. या कारच्या सुरक्षेबाबत या लेखातून माहिती घेणार आहोत.

गेल्या वर्षी ताफ्यात समावेश

नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सर्वात आधी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा ते निवडून आलेत. एसपीजीने त्यावेळी त्यांच्यासाठी रेंज रोवर वोग सेंटिनलचे हाय सिक्योरिटी एडिशन, बीएमडब्ल्यू 7 सिरीज हाय सिक्योरिटी एडिशन आणि टोयोटो लँड क्रूजरचा वापर केला होता. त्यानंतर 2021  मध्ये मर्सिडीज मेबँक एस650 गार्डला प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षेसाठी ताफ्यात सहभागी करण्यात आले.

किंमत 12 कोटी रुपयांपर्यंत

एका रिपोर्टनुसार, सिक्योरिटी अपडेटनंतर या कारची किंमत 12 कोटी रुपयांपर्यंत सांगण्यात येत आहे. या कारची चाकेदेखील पंक्चरप्रूफ असल्याचे सांगण्यात आले आहे. या शिवाय फ्यूअल टँकवर एक प्रकारचे स्पेशल मटेरियलचे कोटींग करण्यात आले आहे. इंधनाच्या टाकीला होल पडल्यावर मटेरियलच्या माध्यमातून ते होल आपोआप भरण्यास मदत होत असते. या कारमध्ये 6.0लीटर व्ही12 ट्‌विन टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

VR10 प्रोटेक्शनचा दर्जा

या कारला VR10 प्रोटेक्शनचा दर्जा प्राप्त करण्यात आला आहे. हे प्रोटेक्शन जगातील कुठल्याही महत्वाच्या व्यक्तीला देण्यात येणारे सर्वोच्च प्रोटेक्शन आहे. ही कार गोळ्यांचा वर्षाव तसेच दोन मीटर अंतरावर झालेलला 15 किग्रा टीएनटीच्या स्पोटाशिवाय गॅस ॲटॅकचाही सामना करु शकते. मर्सिडीज मेबेंक एस650 गार्डला एक्सप्लोसिव्ह रेसिस्टेंट व्हीकल 2010 रेटिंग मिळालेली आहे.