नवीन वर्षात Kia च्या ग्राहकांना झटका, कारच्या किंमतीत 54,000 रुपयांची वाढ

| Updated on: Jan 10, 2022 | 11:49 AM

दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारपेठेतील आपल्या काही मॉडेल्सच्या किमतीत बदल केला आहे. कंपनीने आपल्या एसयूव्ही, सोनेट, सेल्टॉस आणि प्रीमियम एमपीव्ही मॉडेल कार्निव्हलच्या किमती वाढवल्या आहेत.

नवीन वर्षात Kia च्या ग्राहकांना झटका, कारच्या किंमतीत 54,000 रुपयांची वाढ
Kia Cars
Follow us on

मुंबई : दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारपेठेतील आपल्या काही मॉडेल्सच्या किमतीत बदल केला आहे. कंपनीने आपल्या एसयूव्ही, सोनेट, सेल्टॉस आणि प्रीमियम एमपीव्ही मॉडेल कार्निव्हलच्या किमती वाढवल्या आहेत. मॉडेल आणि त्याच्या व्हेरियंटच्या आधारावर ही दरवाढ 4,000 ते 54,000 रुपयांपर्यंत आहे. Kia ने भारतीय बाजारपेठेत कॅरेन्स या आणखी एक SUV मॉडेलचे अनावरण करण्याच्या तयारीमुळे किमतीत वाढ केली आहे. (Kia Hikes Prices Of Its Cars: Up To 54000 Rupees)

किआ कार्निव्हलच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे, या कारला किमान 50,000 रुपयांची वाढ मिळाली आहे. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या ऑटोमेकरच्या चौथ्या मॉडेल Kia Carence ची भारतात 14 जानेवारीपासून बुकिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Kia कार्निव्हल

किआ कार्निव्हल प्रेस्टीज 7 सीटर, प्रेस्टीज 6 सीटर मॉडेल्सची किंमत 54,000 रुपयांनी वाढली आहे, तर प्रीमियम MPV च्या इतर सर्व विद्यमान मॉडेल्सची किंमत आता 50,000 रुपयांनी जास्त असेल. किमतीच्या सुधारणेसह, Kia कार्निव्हल आता 24.95 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह येते, तर या कारचं टॉप व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 33.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागतील.

Kia सेल्टॉस

1.5-लीटर पेट्रोल एचटीई व्हेरिएंट वगळता, सर्व सेल्टॉस मॉडेल्सच्या किमान किंमतीत 9,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एसयूव्हीच्या 1.5-लीटर डिझेल मॉडेलचे एक्स लाइन व्हेरियंट आता 9,000 रुपयांनी महाग झाले आहे, तर 1.5-लीटर पेट्रोल मॉडेलच्या एचटीके व्हेरिएंट आणि 1.4 च्या GTX + DCT, GTX + DCT ड्युअल टोन व्हेरिएंटसाठी खरेदीदारांना आता 11,000 रुपये अधिक खर्च करावे लागतील. इतर सर्व मॉडेल्सवर 10,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Kia सोनेट

1-लीटर टर्बो-पेट्रोल iMT HTK+ आणि 1-लीटर टर्बो-पेट्रोल DCT सह सोनेटच्या एकूण पाच व्हेरिएंटच्या किंमतीमध्ये सुधारणा झालेली नाही. 1-लीटर टर्बो पेट्रोल IMT च्या HTX+, HTX+ ड्युअल टोन व्हेरिएंट आणि 1.2-लीटर पेट्रोल मॉडेलच्या HTK+ व्हेरिएंटमध्ये किमान 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. 1-लीटर टर्बो-पेट्रोल IMT मॉडेलच्या HTX आणि HTX अॅनिव्हर्सरी एडिशन वगळता, ज्याची इतर व्हेरिएंटच्या किंमतीत 10,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

डिझेल मॉडेलमध्ये, HTE MT आणि HTK MT व्हेरिएंटच्या किमतीत 10,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर GTX+ AT आणि GTX AT+ ड्युअल टोनच्या किमती 14,000 रुपयांनी वाढल्या आहेत. Kia Sonet च्या इतर सर्व डिझेल मॉडेल्सच्या किमतीत 20,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

इतर बातम्या

Maruti ते Hyundai, किफायतशीर किंमतीत ऑटोमॅटिक गियरवाल्या कार, पाहा यादी

सिंगल चार्जवर 95 किमी ड्रायव्हिंग रेंज, Bajaj Chetak Electric Scooter पुणे, बंगळुरुनंतर आता मुंबईतही उपलब्ध

i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती

(Kia Hikes Prices Of Its Cars: Up To 54000 Rupees)