कातील लूक… दमदार कामगिरी, फुल चार्जनंतर दामटा 656 किमी, इलेक्ट्रिक कारमध्ये Mahindra ची खेळी
Mahindra XEV 9e Cineluxe Edition: महिंद्रा कंपनीने इलेक्ट्रिक कार बाजारात जबरदस्त खेळाडू उतरवला आहे. महिंद्राने XEV 9e Cineluxe Edition ची नवीन Satin Desert Myst रंगातील कार उतरवली आहे. काय आहे वैशिष्ट्ये?

Mahindra XEV 9e Cineluxe Edition: महिंद्राने प्रिमियम इलेक्ट्रिक SUV Mahindra XEV 9e Cineluxe Edition आता आणखी आकर्षक केली आहे. कंपनीने एक नवीन एक्सटिरीअर रंगाचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या नवीन रंगाचे नाव Satin Desert Myst असे आहे. ही कार कास मॅट (Satin) फिनिशिंगसह येते. त्यामुळे या SUV चा लूक अधिक प्रीमियम आणि स्टायलिश दिसतो. कातील लूकसह ही कार ग्राहकांच्या कसोटीवरही खरी उतरण्याचा दावा करण्यात आला आहे. एकदा चार्ज झाल्यावर कारमध्ये 656 किमीची रपेट मारता येणार आहे.
नवीन रंग, कामगिरी दमदार
Mahindra ने या स्पेशल एडिशनमध्ये केवळ नवीन रंग जोडला आहे. याशिवाय या SUV चे फीचर्स, इंजिन, बॅटरी, डिझाईन आणि इतर स्पेसिफिकेशन जैसे थे आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन Satin Desert Myst फिनिशिंग ग्राहकांना भुरळ घालणारी आहे. Desert Myst रंगामुळे ही कार उठून दिसेल. Cineluxe Edition मध्ये या कारचा लूक अनेकांना आवडणारा आहे. ही कार एकदम खास दिसते.
मनमोहक इंटिरिअर
नवीन Satin Desert Myst रंगाच्या या SUV च्या आतील इंटिरिअर एकदम क्लास आहे. Chestnut Brown आणि Nocturne Black रंगाचे ड्युएल टोन लेदरेट इंटिरिअर मिळते. या प्रिमियम केबिनमुळे SUV च्या आत लक्झरीयस वाटते. स्टाईलिश एसयुव्ही, आराम आणि प्रीमियम फील हवे असणाऱ्या ग्राहकांना Cineluxe Edition एक चांगला पर्याय मानल्या जात आहे.
किंमतीत नाही बदल
Mahindra ने रंगसंगती बदलली असली तरी कारच्या किंमतीत कोणताच मोठा बदल केलेला नाही. Mahindra XEV 9e Cineluxe Edition ची एक्स शोरूम किंमत 29.35 लाख रुपये इतकी आहे. ग्राहकांना अतिरिक्त किंमत न देता नवीन Satin Desert Myst रंगाची कार खरेदी करता येईल.
फुल चार्ज करा नि 656 किलोमीटर दामटा
ही इलेक्ट्रिक कार SUV Pack Three व्हेरिएंटवर आधारीत आहे. यामध्ये 79 kWh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. रिअर व्हील ड्राईव्हसह ही इलेक्ट्रिक मोटार धावेल. या कारमध्ये 286 हॉर्सपावरची (HP) ताकत आणि 380 Nm टॉर्क तयार होईल. ही एसयुव्ही दमदार कामगिरी करेल असा दावा करण्यात येतो. कंपनीच्या म्हणण्यांनुसार, एकदा फुल चार्ज झाल्यावर ही कार 656 किलोमीटरपर्यंत (MIDC) धावेल. लांब पल्ल्यासाठी हा कार ग्राहकांच्या पसंतीला उतरेल असा कंपनीचा विश्वास आहे.