
कुटुंबाची सुरक्षा सर्वप्रथम, ही बाब ध्यानात घेऊन आता कार कंपन्या कमी बजेटमधल्या कार मार्केटमध्ये आणत आहेत. स्वस्तातील या कार्सच्या बेस वेरिएंट्समध्ये सुद्धा 6 Airbags ची सुविधा मिळू लागली आहे. जर, तुमचं बजेट 6 लाख रुपये आहे, तर या बजेटमध्ये कोण-कोणत्या कार्स तुम्हाला 6 एअरबॅग्ससोबत मिळणार, जाणून घेऊया. अलीकडेच Maruti Suzuki Celerio अपडेट करण्यात आलय. आता या कारच्या सर्व वेरिएंट्समध्ये सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स मिळू लागल्या आहेत. या कारची किंमत किती आहे आणि या कारला कोणती गाडी या रेंजमध्ये टक्कर देते, जाणून घेऊया.
Maruti Suzuki Celerio Price
मारुतीच्या या हॅचबॅकच्या बेस वेरिएंटची किंमत 5 लाख 64 हजार रुपये (एक्स शोरूम) आहे. या गाडीची टॉप वेरिएंट खरेदी करण्यासाठी 7 लाख 37 हजार रुपए (एक्स शोरूम) खर्च करावे लागतील.
Maruti Suzuki Celerio Mileage
मारुति सुजुकीच्या या स्वस्तातील हॅचबॅकवर एक लीटर इंधनामध्ये उत्तम मायलेज मिळतो. पेट्रोल वेरिएंटमध्ये या कारवर 25.24 किलोमीटर ते 26.00 किलोमीटर पर्यंत मायलेज मिळतो. दुसऱ्याबाजूला ही कार सीएनजी वेरिएंटमध्ये एक किलोत 34.43 किलोमीटर पर्यंत पळू शकते.
सेफ्टी फीचर्स
6 लाख रुपयाच्या या स्वस्त कारमध्ये सर्व वेरिएंट्सवर 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. सोबतच हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबलिटी प्रोग्राम, EBD सह ABS आणि रिवर्स पार्किंग सेंसर सारखे खास सेफ्टी फिचर्स मिळतील.
Hyundai Grand i10 Nios Price
हुंडईकडे सुद्धा 6 लाख रुपयापेक्षा कमी किंमतीत 6 एअरबॅग्सवाली स्वस्त हॅचबॅक आहे. मारुति सुजुकी सेलेरियोला ही कार टक्कर देते. Hyundai Grand i10 Nios ची बेस वेरिएंट खरेदी करण्यासाठी 5 लाख 98 हजार 300 रुपए खर्च (एक्स शोरूम) करावे लागतील.
Hyundai Grand i10 Nios Price
टॉप मॉडलची किंमत 8 लाख 38 हजार 200 रुपये (एक्स शोरूम) आहे. दोन्ही कार्सच्या बेस वेरिएंटच्या किंमतीत 34,300 रुपये (एक्स शोरूम) ते टॉप वेरिएंटच्या किंमतीत 1,01,200 रुपयाच (एक्स शोरूम) अंतर आहे. हुंडई ग्रँड आय 10 नियोसमध्ये 6 एअरबॅग्स शिवाय हिल असिस्ट कंट्रोल, ड्राइवर रियर व्यू मॉनिटर आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबलिटी कंट्रोल सारखे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.