मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई विटारा लाँच, क्रेटा आणि कर्व्हव्हला देणार टक्कर

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार ई विटारा अखेर ग्राहकांसाठी लाँच झाली आहे. प्रत्येकजण मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीची आतुरतेने वाट पाहत आहे. कंपनी ही एसयूव्ही किती किमतीत लाँच करेल याबद्दल जाणून घेऊयात...

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई विटारा लाँच, क्रेटा आणि कर्व्हव्हला देणार टक्कर
मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई विटारा लाँच, क्रेटा आणि कर्व्हव्हला देणार टक्कर
Image Credit source: Maruti Suzuki
Updated on: Dec 03, 2025 | 8:51 PM

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार ई विटारा ग्राहकांसाठी लाँच करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लाँच आधीच सादर करण्यात आल्याने या कारच्या अनेक प्रमुख फिचर्सची पुष्टी करण्यात आली आहे. मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या लाँचची सर्वांना उत्सुकता लागली होती मात्र ती अखेर संपली आहे. कारण मारूती सुझुकीने ग्राहकांच्या गरजा बघुन इलेक्ट्रिक कार ई विटारा लाँच केली. जर तुम्हालाही या कार खरेदी करण्याबद्दल उत्सुकता असेल, तर कारच्या वैशिष्ट्यांवर तसेच किंमतीबद्दल जाणून घेऊयात.

मारुती सुझुकी ई विटारा फिचर्स आणि रेंज

सनरूफ ही एक लोकप्रिय निवड आहे आणि हे लक्षात घेऊन कंपनीने या एसयूव्हीला एक आलिशान टच देऊन फिक्स्ड ग्लाससह पॅनोरॅमिक सनरूफ देखील समाविष्ट केला आहे. आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवासाठी व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यामध्ये उपलब्ध आहे.

या एसयूव्हीमध्ये 10-वे पॉवर-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, प्लेक्सिबल बूट स्पेस आणि स्लाइडिंग आणि रिक्लाइनिंग रीअर सीट्स सारखे फिचर्स देखील आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीने वायरलेस चार्जिंग देखील प्रदान केले आहे. 61kWh बॅटरीने भरलेली मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर 500 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.

मारुती सुझुकी ई विटारा सुरक्षा फिचर्स

ई विटारामध्ये एक नसून तर अनेक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), सहा एअरबॅग्ज आणि एक एक्स्ट्रा ड्रायव्हर नी एअरबॅगसह समावेश करण्यात आला आहे. यात लेव्हल 2 ADAS (अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) सिस्टम देखील आहे, ज्यामध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, अ‍ॅडॉप्टिव्ह इमर्जन्सी ब्रेकिंग आणि हाय बीम असिस्ट सारख्या 15 हून अधिक फिचर्सचा समावेश आहे.

मारुती सुझुकी ई विटारा किंमत

49 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅक असलेल्या बेस मॉडेलची किंमत सुमारे 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची अपेक्षा आहे, तर हाय-पावर मोटर आणि 61 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅक असलेल्या मॉडेलची किंमत 25 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. भारतीय बाजारात eVitara इलेक्ट्रिक SUV MG ZS EV, Tata Curve EV, Hyundai Creta EV आणि Mahindra BE 6 शी स्पर्धा करेल.