35 किमी मायलेज, प्रत्येक तरुणांची आवडती कार, किंमत खूपच कमी, खरेदीसाठी प्रचंड गर्दी

प्रत्येक तरुणांची आवडती कार, CNG मध्ये देते 35 किमी मायलेज. 6 एअरबॅग आणि कारचा लुक असा की मुलींची देखील प्रचंड आवडती. दिवाळीमध्ये मिळतोय 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट.

35 किमी मायलेज, प्रत्येक तरुणांची आवडती कार, किंमत खूपच कमी, खरेदीसाठी प्रचंड गर्दी
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 06, 2026 | 3:11 PM

मारुती सुझुकीची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टवर नोव्हेंबर 2026 मध्ये ग्राहकांना आकर्षक डिस्काउंट ऑफर्स मिळत आहेत. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 50 हजार रुपयांपर्यंत तर CNG व्हेरिएंटवर 30 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. स्विफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.79 लाख रुपये आहे.

पेट्रोल व्हेरिएंटवर 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस, 10 हजार रुपये स्क्रॅपेज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे एकूण 50 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

Loading...

दुसरीकडे, CNG व्हेरिएंटवर कॅश डिस्काउंट नाही. मात्र, 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस, 10 हजार रुपये स्क्रॅपेज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळून एकूण 30 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो.

इंजिन आणि मायलेज

स्विफ्टमध्ये 1997 सीसीचे Z-Series पेट्रोल इंजिन दिले आहे. पेट्रोल मोडमध्ये हे इंजिन 82.93 PS पॉवर आणि 112.4 Nm टॉर्क देते. तर CNG मोडमध्ये 69.75 PS पॉवर आणि 101.8 Nm टॉर्क मिळतो. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय आहेत.

कंपनीच्या दाव्यानुसार, स्विफ्टच्या मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 24.80 kmpl, तर AMT व्हेरिएंटचे मायलेज 25.75 kmpl आहे. CNG व्हेरिएंटचे मायलेज 35.34 किमी पर्यंत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

फीचर्स आणि सेफ्टी

स्विफ्टमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले, वायरलेस चार्जर, रिअर AC व्हेंट्स आणि रिअर व्ह्यू कॅमेरा यांसारखे फीचर्स मिळतात. याशिवाय ऑटो क्लायमेट कंट्रोलची सुविधाही देण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग, ESP, हिल होल्ड कंट्रोल, ABS, EBD, ब्रेक असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट देण्यात आले आहेत.

सांगायचे झाले तर, आकर्षक लूक, आधुनिक फीचर्स, चांगले मायलेज आणि पेट्रोल- CNG पर्यायांमुळे मारुती स्विफ्ट ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. मात्र, डिस्काउंटची रक्कम शहर, डीलर आणि उपलब्ध स्टॉकनुसार बदलू शकते. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी स्थानिक डीलरकडून ऑफर्सची खात्री करून घ्यावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us