AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Top Selling Cars : मारुती सुझुकीचा बाजारात दबदबा! ‘या’ 4 गाड्यांची विक्रमी विक्री; ब्रेझाची तुफान कामगिरी, तर सेलेरियोत 248% वाढ

Maruti Top Selling Cars : आपल्याकडे देखील कार असली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. पण बजेट बसत नसल्यामुळे अनेकांचं कारचं स्वप्नपूर्ण होतच नाही. अशात मारुतीच्या अशा काही कार आहेत, ज्या बाजारात दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. गेल्या महिल्यात 'या' 4 गाड्यांची विक्रमी विक्री झाली आहे.

Maruti Top Selling Cars : मारुती सुझुकीचा बाजारात दबदबा! 'या' 4 गाड्यांची विक्रमी विक्री; ब्रेझाची तुफान कामगिरी, तर सेलेरियोत 248% वाढ
| Updated on: Nov 18, 2026 | 11:05 AM
Share

Maruti Top Selling Cars October 2026 : भारतात कोणत्या कारला सर्वात जास्त मागणी असेल तर, त्या मारुती सुझुकीच्या कार आहे. ऑक्टोबर महिन्यांनी अनेकांनी मारुती सुझुकीच्या कार्सना पसंती दिली आणि ऑक्टोबर 2026 मध्ये या कंपनीच्या कारच्या विक्रीत मोठी वाढ झाली. समोर येत असलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात मारुती सुझुकीच्या गाड्यांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या मजबूत मागणीच्या जोरावर कंपनीने देशांतर्गत बाजारात एकूण 2, 12,384 पॅसेंजर वाहनांची विक्रमी विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विकल्या गेलेल्या 1,76,318 युनिट्सच्या तुलनेत ही वार्षिक 20 टक्क्यांची दमदार वाढ आहे. या कामगिरीमध्ये मारुतीच्या वेगवेगळ्या सेगमेंटमधील गाड्यांनी मोठं योगदान दिलं आहे. विशेषतः कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV), लोकप्रिय हॅचबॅक आणि नवीन कारने वार्षिक विक्रीत जबरदस्त वेग पकडून हे सिद्ध केलं आहे की, भारतीय ग्राहकांमध्ये आजही मारुतीच्या मॉडेल्सची क्रेझ कायम आहे. तर जाणून घ्या, मारुतीच्या अशाच 5 प्रमुख कार, ज्यांच्या विक्रीत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर : अनेकांनी मारुती सुझुकीची सर्वात आवडती कायम फॅमेली हॅचबॅग वॅगनआर (WagonR) या कारने ऑक्टोबर 2026 मध्ये दमदार प्रदर्शित करत, विक्रीमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. या काळात वॅगनआरच्या एकूण 23 हजार 747 युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर 2025 मध्ये हा आकडा 18 हजार 970 युनिट्स इतका होता.

मारुती ब्रेझा : सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची किंग मारुती ब्रेझाची ऑक्टोबर महिन्यात विक्रमी विक्री झाली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये ब्रेजाची कुल 22 हजार 436 यूनिट्स डिस्पॅत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विकल्या गेलेल्या 12 हजार 72 युनिट्सच्या तुलनेत ही वार्षिक 86 टक्क्यांची वाढ आहे.

मारुती सेलेरियो : मारुतीच्या पोर्टफोलियोमध्ये सेलेरियो देखील बेस्ट ठरत आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये सेलेरियोच्या एकूण 4 हजार 607 युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर 2025 मध्ये केवळ 1 हजार 322 युनिट्सच विकली जाऊ शकली होती. अशा प्रकारे या स्टायलिश हॅचबॅकने 248 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे, जी मारुतीच्या लाइनअपमधील कोणत्याही सातत्यपूर्ण विकल्या जाणाऱ्या मॉडेलमध्ये सर्वाधिक आहे.

मारुती सुजुकी एसयूव्ही : मारुती सुजुकीची आधुनिक मिडसाईज एसयूव्ही व्हिक्टोरिसनेही सणासुदीच्या दिवसांत आपलं मजबूत स्थान निर्माण केलं आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये व्हिक्टोरिसच्या एकून 16 हजार 792 युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विकल्या गेलेल्या 13 हजार 496 युनिट्सच्या तुलनेत 24 टक्क्यांची वार्षिक वाढ दर्शवते.

Follow Us
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी मंत्रालयात...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; - राऊत
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पटलवार
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरू
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरून नवनाथ बनांचा ठाकरे गटाला टोला!
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या...
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण!
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार?
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार? शेतकऱ्यांनाही...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून मोठी कारवाई!
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?