Maruti Car : 34 किमीचा मायलेज किंमत फक्त 5.54 लाख रूपये, मारूतीच्या या गाडीने लावले सर्वांना वेड

गेल्या एप्रिलमध्ये हॅचबॅक कारने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली असून, त्यात मारुती सुझुकीच्या गाड्या आघाडीवर आहेत.

Maruti Car : 34 किमीचा मायलेज किंमत फक्त 5.54 लाख रूपये, मारूतीच्या या गाडीने लावले सर्वांना वेड
मारूती कारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 10:35 PM

मुंबई : भारतीय बाजारपेठेत SUV सेगमेंटच्या वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे, विशेषत: लोक कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटच्या कारला पसंती देत आहेत. तथापि, अजूनही हॅचबॅक कारचे विक्रीच्या चार्टवर वर्चस्व आहे. गेल्या एप्रिलमध्ये हॅचबॅक कारने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली असून, त्यात मारुती सुझुकीच्या गाड्या आघाडीवर आहेत. मारुती सुझुकीचा टॉल बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती वॅगनआरने (Maruti Wagon R) पुन्हा एकदा सर्वांना मागे सोडले आहे. त्याच वेळी, दुसरी आणि तिसरी कार देखील मारुती सुझुकीची आहे. चला तर मग एक नजर टाकूया देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर

मारुती वॅगन आर: रु 5.54 लाख

मारुती सुझुकी वॅगनआर त्याच्या विशिष्ट बॉक्सी डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात या कारच्या एकूण 20,879 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने ही कार दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह सादर केली आहे, एका व्हेरियंटमध्ये 1.0-लिटर क्षमतेचे इंजिन आहे तर दुसर्‍या प्रकारात 1.2-लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे.

हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. ही कार CNG प्रकारातही विक्रीसाठी उपलब्ध आहे, तिचे पेट्रोल प्रकार 23.56 किमी मायलेज देते आणि CNG प्रकार 34.05 किमी मायलेज देते. त्याची किंमत 5.54 लाख ते 7.42 लाख रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

मारुती स्विफ्ट: रु. 6.00 लाख

मारुती सुझुकीने आपल्या प्रसिद्ध हॅचबॅक कार स्विफ्टच्या एकूण 18,573 युनिट्सची विक्री केली आहे, ज्यासह ती देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. एकूण चार प्रकारांमध्ये येणारी मारुती सुझुकी स्विफ्ट भारतीय ग्राहकांमध्ये बऱ्याच काळापासून लोकप्रिय आहे. या कारमध्ये कंपनीने 1.2 लीटर क्षमतेचे ड्युअल जेट पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 90PS चा पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते.

ही कार पेट्रोल इंजिन तसेच CNG प्रकारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. साधारणपणे, कारचे पेट्रोल मॉडेल 22 किमी आणि सीएनजी मॉडेल 30 किमी मायलेज देते. त्याची किंमत रु.6.00 लाख ते रु.9.03 लाख आहे.

मारुती बलेनो: 6.61 लाख रुपये

मारुती बलेनो ही कंपनीने देशांतर्गत बाजारात ऑफर केलेली पहिली आणि एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे. गेल्या एप्रिल महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण 16,180 युनिट्सची विक्री केली आहे. या कारमध्ये कंपनीने 1.2 लीटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 12 व्होल्ट माईल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानासह येते. हे इंजिन 89Bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिनसोबत ही कार CNG प्रकारातही उपलब्ध आहे. याचे पेट्रोल व्हेरियंट 22.35 किमी/लिटरपर्यंत मायलेज देते आणि सीएनजी व्हेरिएंट 30.61 किमी/किलोपर्यंत मायलेज देते.

अलीकडेच, या कारमध्ये काही नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ज्यात 6 एअरबॅग्ज, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ब्रेक असिस्ट, सीट- बेल्ट टेन्शनर इत्यादी दिले आहेत. याशिवाय हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रिअर डिफॉगर, ऑल पॉवर विंडो, कीलेस एंट्री, सेंट्रल लॉकिंग, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल आदी फीचर्स या कारमध्ये उपलब्ध आहेत. त्याची किंमत 6.61 लाख रुपये ते 9.88 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याची किंमत 6.61 लाख ते 9.88 लाख रुपये आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.