स्वप्न पूर्ण होणार! या 7 सीटर कारवर मिळतेय 3.70 लाखांची सूट, घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी, कारचा लूक पाहून…

हीच आहे सर्वात मोठी कार घेण्याची संधी. या 7 सीटर कारवर मिळतेय 3.70 लाखांपर्यंतची मोठी सूट. लोकांची कार खरेदीसाठी मोठी गर्दी. शेवटची तारीख किती?

स्वप्न पूर्ण होणार! या 7 सीटर कारवर मिळतेय 3.70 लाखांची सूट, घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी, कारचा लूक पाहून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 16, 2026 | 12:19 PM

भारतातील वाहन बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या विशेष सवलती जाहीर करत असतात. अशातच MG Motor ने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक कार्सवर मोठ्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

या ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना लाखो रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळत आहे. कंपनीने ही विशेष ऑफर कॅम्पेन ‘डिस्काउंट कार्निवल’ म्हणून सुरू केली आहे.

तब्बल 3.70 लाख रुपयांपर्यंत सवलत

जर तुम्ही दमदार आणि लक्झरी फुल-साइज एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य मानला जात आहे. MG Gloster या फ्लॅगशिप एसयूव्हीवर कंपनी तब्बल 3.70 लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंटसोबत एक्सचेंज बोनसचाही समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बचत करता येणार आहे.

भारतामध्ये लोकप्रिय असलेल्या MG Hector या मिड-साइज एसयूव्हीवर देखील कंपनीकडून मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. हेक्टरच्या जुन्या व्हर्जनवर ग्राहकांना 1.65 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. तर नवीन मॉडेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही 1.10 लाख रुपयांपर्यंत बचत मिळणार आहे. या ऑफरमध्ये कॅश बेनिफिट्ससोबत लॉयल्टी बोनसचाही समावेश आहे.

इलेक्ट्रिक कार्सवरही सवलत

एमजीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांवरही आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही MG ZS EV खरेदी केल्यास ग्राहकांना 80 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे शहरातील प्रवासासाठी लोकप्रिय असलेल्या MG Comet EV या इलेक्ट्रिक कारवरही 50 हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.

MG Astor वरही मोठी बचत

उत्तम तंत्रज्ञान आणि एआय फीचर्ससाठी ओळखली जाणारी MG Astor या एसयूव्हीवरही कंपनीने खास ऑफर दिली आहे. या गाडीच्या खरेदीवर ग्राहकांना 85 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. या पॅकेजमध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट सवलत आणि लॉयल्टी बेनिफिट्सचा समावेश आहे.

मर्यादित कालावधीसाठी ऑफर

MG Motor कडून जाहीर करण्यात आलेल्या या सर्व ऑफर्स मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा उपलब्ध स्टॉक संपेपर्यंत लागू असतील. तसेच शहर आणि डीलरशिपनुसार या सवलतींमध्ये थोडा फरक असू शकतो. त्यामुळे वाहन खरेदी करण्यापूर्वी जवळच्या शोरूममध्ये जाऊन संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.

Follow Us