वाहन खरेदीवेळी ग्राहकांना घरबसल्या कर्ज मिळणार, MG Motor चा ऑनलाईन ऑटो फायनान्स प्लॅटफॉर्म MG E-Pay लाँच

| Updated on: Mar 26, 2022 | 4:45 PM

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) त्वरित कर्ज मंजूरीसह एंट-टू-एंड ऑनलाइन ऑटो फायनान्स सुविधेसाठी वन-स्टॉप ऑनलाइन कार फायनान्स व्यासपीठ (Online Car Finance Platform) एमजी ई-पे (MG E-Pay) लाँच केलं आहे.

वाहन खरेदीवेळी ग्राहकांना घरबसल्या कर्ज मिळणार, MG Motor चा ऑनलाईन ऑटो फायनान्स प्लॅटफॉर्म MG E-Pay लाँच
MG ZS EV (प्रातिनिधिक फोटो)
Follow us on

मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) त्वरित कर्ज मंजूरीसह एंट-टू-एंड ऑनलाइन ऑटो फायनान्स सुविधेसाठी वन-स्टॉप ऑनलाइन कार फायनान्स व्यासपीठ (Online Car Finance Platform) एमजी ई-पे (MG E-Pay) लाँच केलं आहे. पारदर्शक व सोईस्कर ऑनलाइन कार खरेदी सोल्यूशन्स देण्याच्या मनसुब्यासह डिझाइन करण्यात आलेले एमजी ई-पे ग्राहकांना त्यांच्या घरामध्येच आरामशीरपणे स्थिर, एकसंधी, पारदर्शक व जलद कर्ज मंजूरी होण्याची सुविधा मिळवण्यास मदत करेल. एमजीने एमजी ई-पे अंतर्गत कस्टमाईज व त्वरित फायनान्सिंग पर्याय देण्यासाठी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा प्राइम आणि अॅक्सिस बँकेसोबत सहयोग केला आहे. एमजी मोटर इंडियाने ईएक्स्पर्ट आणि ई-पे सह आधुनिक काळातील ग्राहकांसाठी डिजिटल कार एक्स्पोरेशन आणि खरेदी अनुभवामध्ये वाढ केली आहे.

ईएक्स्पर्ट ग्राहकाला सर्वांगीण डिजिटल अनुभव देतो, तर ई-पे ऑनलाइन फायनान्सिंग सोल्यूशन्समध्ये स्थिरतेची भर करत अधिक सुविधा देते, ज्यामुळे शोध घेण्यापासून डिलिव्‍हरीपर्यंचा प्रवास कस्टमाईज व ग्राहक-केंद्रित बनतो.

एमजी मोटर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, “एमजीमध्ये आम्ही ग्राहकांसह कनेक्टेड राहण्यासाठी आणि दर्जात्मक अनुभवाची खात्री देण्यासाठी आमच्या डिजिटल व्यासपीठांमध्ये सतत नाविन्यता आणतो. एमजी ऑनलाइन खरेदी व्यासपीठाच्या माध्‍यमातून लाखांहून अधिक ग्राहकांच्या गरजांची प्रभावीपणे पूर्तता केल्यानंतर आमचा अधिक पुढाकार घेण्याचा आणि ग्राहकांना ऑनलाइन कार खरेदीसाठी सुलभपणे योग्य फायनान्सिंग पर्याय उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे.”

खरेदी प्रक्रिया सोपी होईल

एमजी ई-पे 5 क्लिक्स व 7 सोप्या पायऱ्यांमध्ये ग्राहक खरेदी प्रक्रिया सुलभ करेल. ग्राहकांना आता ऑनलाइन किंवा त्यांच्या जवळच्या एमजी डिलरशिप्समध्ये एमजी कार्स बुक करण्याची, त्यांच्या कार्सना अॅक्सेसरीज, मर्चंडाइज, प्रोटेक्ट प्लान्स इत्यादींसह कस्टमाईज करण्याची सुविधा आहे. तसेच ग्राहकांना विविध फायनान्सकडून प्री-अप्रूव्ह लोन ऑफर्स देखील उपलब्ध आहेत आणि ते कर्ज मुदत, रक्कम व व्याजदर सानुकूल करू शकतात. ग्राहक घराबाहेर न पडता ऑनलाइन या फायनान्शियल सेवांचा लाभ घेऊ शकतात. तसेच ते रिअल-टाइममध्ये लोन अप्रूव्हल स्थिती व सँक्शन लेटर्सवर देखरेख ठेवू शकतात आणि घरपोच नवीन कार्स प्राप्त करू शकतात.

4 बँकांसोबत भागीदारी

ऑटो उद्योगक्षेत्रामध्ये पहिल्यांदाच ऑनलाइन फायनान्स सुविधा ऑनलाइन व ऑफलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांसोबत सध्याच्या व नवीन बँक ग्राहकांसाठी देखील उपलब्ध असेल. एमजी ई-पेची नवीन कार कर्जसुविधा 4 बँकांमध्ये (आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा प्राइम व अॅक्सिस बँक) सुरू आहे आणि ब्रॅण्ड आपला पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी इतर बँका व एनबीएफसींसोबत सहयोगाने काम करत आहे, ज्यामधून संभाव्य ग्राहकांना अधिक निवडी मिळतील.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 220 KM रेंज, Komaki DT3000 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच

सर्वात मोठी चाकं असलेली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Car Insurance | वाहन विमा घेताय? या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष; चांगल्या डीलसाठी रहा आग्रही