
टायर निर्माता कंपनी मिशेलिन नेक्स्ट जनरेशन शेवरले बोल्ट इलेक्ट्रिक कारसाठी पंक्चर-प्रूफ टायर सिस्टम किंवा एअरलेस टायरवर काम करत आहे. कंपनी पुढील तीन ते पाच वर्षांत मिशेलिन अप्टिस नावाचे उत्पादन व्यावसायिकरित्या बाजारात आणण्याची योजना आखत आहे.

शेवरलेटने 2021 साठी बोल्ट EV ला तिच्या हाय व्हर्जनच्या लाँचिंगसह रीफ्रेश केले आहे. कंपनीने 2025 च्या सुरुवातीला नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याची योजना बनवली आहे, असे म्हटले जात आहे. परंतु शेवरलेटने अद्याप टाइमलाइनची पुष्टी केलेली नाही.

मिशेलिनने 2019 मध्ये एअरलेस टायरच्या चाचणीसाठी चेवी बोल्टचा वापर केला आहे. पण मिशेलिन अप्टिस टायर असलेली ही एकमेव कार नाही. मिशेलिन एअरलेस टायर्ससह मिनी कूपर एसई देखील 2021 मध्ये पाहायला मिळाली होती. 2019 मध्ये पहिल्यांदा अधिकृतपणे Uptis एअरलेस टायर्स सादर करण्यात आले होते.

मिशेलिन अप्टिस बेल्ट आणि स्पोक तसेच वाहनाच्या वजनाला आधार देण्यासाठी अनेक पातळ आणि मजबूत फायबरग्लासपासून बनवलेले. मिशेलिनने पंक्चर-प्रूफ टायर तंत्रज्ञानासाठी 50 पेटंट दाखल केले आहेत.

Uptis टायर्सचा फायदा म्हणजे ते पंक्चर-प्रूफ आहेत. पंक्चरमुळे दाब वेगाने कमी होऊ शकतो. एअरलेस टायर्स सुरू केल्याने टायर बनवण्यासाठी लागणारा खर्च, साहित्य आणि ऊर्जा कमी करता येऊ शकते.