ड्रेनेजच्या पाण्यावर बुंगाट धावणार रेसिंग कार; पेट्रोल-डिझेलची सुट्टी, तो प्रयोग तरी काय?

Racing Car on Sewage : ब्रिटेनच्या अभियंत्यांनी कमाल केली आहे. त्यांनी रेसिंग कारचे एक अनोखे प्रोटोटाईप तयार केले आहे. ही कार ड्रेनेजच्या पाण्यावर, नालीच्या पाण्यावर धावणार आहे. काय आहे हा नवीन प्रयोग, जाणून घ्या...

ड्रेनेजच्या पाण्यावर बुंगाट धावणार रेसिंग कार; पेट्रोल-डिझेलची सुट्टी, तो प्रयोग तरी काय?
बुंगाट
| Updated on: Aug 20, 2025 | 3:35 PM

आलिशान, वेगवान कारचे वेडं प्रत्येकाला असतं. पेट्रोल-डिझेल कारला आता इलेक्ट्रिक कारचा पर्याय समोर येऊ पाहत आहे. पण त्याला अनेक मर्यादा आहेत. सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार सुद्धा बाजारात येत आहे. पण किंमतींमुळे त्या सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहेत. पण आता अजून एक नवीन प्रयोग झाला आहे. वायुप्रदूषण थांबवण्यासाठी आणि पर्यावरण पूरक कार निर्मितीवर जगभरात प्रयोग सुरू आहेत. ब्रिटेनच्या अभियंत्यांनी कमाल केली आहे. त्यांनी रेसिंग कारचे एक अनोखे प्रोटोटाईप तयार केले आहे. ही कार ड्रेनेजच्या पाण्यावर, नालीच्या पाण्यावर धावणार आहे. काय आहे हा नवीन प्रयोग, जाणून घ्या…

काय आहे हा प्रयोग?

ही कार थेट सीवेज, ड्रेनेज अथवा नालीच्या पाण्यावर चालणार नाही. तर त्यावर ट्रिटमेंट टेक्नॉलॉजीच्या मदतीने धावेल. या प्रक्रियेत सुक्ष्म जीवाणू उपयोगी ठरतील. त्यांच्या मदतीने हायड्रोजन वायू तयार करण्यात येईल. या हायड्रोजनवर ही कार धावेल. वारविक विद्यापीठातील संशोधन कर्त्या विद्यार्थ्यांचा वारविक मॅन्युफॅक्चरिंग ग्रुप (WMG) आहे. यामध्ये सीव्हेज ट्रीटमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करून हा प्रोटोटाईप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपचा दावा आहे की, ही कार येत्या पाच वर्षात जगभरात उपलब्ध होईल. ती अनेक देशांच्या रस्त्यावर दिसेल.

हायड्रोजन हे भविष्यातील इंधन

WMG चे मुख्य अभियंता डॉ. जेम्स मेरेडिथ यांनी बीबीसी स्पोर्ट्सला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, इलेक्ट्रिक वाहनांवर सध्या जोर देण्यात येत आहे. पण त्याला काही पर्याय सुद्धा बाजारात असायला हवेत. त्यामुळे जगभरात आता हायड्रोजनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान मायक्रोबियल इलेक्ट्रोलायसिस सेल नावाचे एक उपकरण वापरते. हे तंत्रज्ञान पाणी स्वच्छ करते. या प्रक्रियेत सुक्ष्म जीवाणू कार्बून तंतूंवर वाढतात. सांडपाण्याचे विघटन करतात. त्यातून उप-उत्पादन म्हणून हायड्रोजनची निर्मिती होते.

या कारची रचना पण एकदम खास आहे. ही कार पर्यावरण पुरक स्त्रोतांआधारे तयार करण्यात आली आहे. पुनर्उत्पादित कार्बन फायबर आणि बीटपासून तिहची निर्मिती करण्यात आली आहे. हे हायड्रोजन तंत्रज्ञान पेट्रोलसारखेच मदतीला येईल आणि त्यातून कार वेगाने धावेल, असा विश्वास या प्रयोगाचे प्रमुख डॉ.मेरेडिथ यांनी व्यक्त केला आहे.