Car : रेनॉल्टच्या ‘या’ कारवर 95 हजारापर्यंतच्या ऑफर… दरमहा 4999 च्या ईएमआयवर खरेदी करा शानदार कार

| Updated on: Jul 14, 2022 | 4:32 PM

रेनॉल्ट क्विड कंपनी आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेउन आली असून कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय कार्स केवळ 4999 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येणार आहेत. 4999 रुपयांचा ईएमआय 3.13 लाख रुपयांच्या कर्जावर आधारित असून यासाठी ग्राहकांना ८४ महिन्यांसाठी ४९९९ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. Renault Kwid 4.64 लाखांपासून ते 6.09 लाख रुपये एक्सशोरूम किंमतीपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Car : रेनॉल्टच्या ‘या’ कारवर 95 हजारापर्यंतच्या ऑफर... दरमहा 4999 च्या ईएमआयवर खरेदी करा शानदार कार
रेनॉल्ट
Image Credit source: social
Follow us on

मुंबई :  ज्या ग्राहकांना मोठ्या ईएमआयचा (EMI) भार नको आहे, अशांसाठी ऑटो कंपनी रेनॉल्टने एक चांगली ऑफर आणली आहे. ग्राहक केवळ ५००० रुपयांच्या ईएमआयमध्ये कार खरेदी करू शकणार आहेत. जे ग्राहक 7000 रुपयांपर्यंतचा ईएमआय भरू शकतात अशांसाठीही  रेनॉल्टकडून एक चांगली ऑफर आणण्यात आली असून या माध्यमातून ग्राहक एक चांगली कॉम्पॅक्ट एसयुव्ही (Compact SUV) देखील खरेदी करु शकणार आहेत. रेनॉल्टने आपल्या तीन कार्ससाठी ही ऑफर आणली आहे. 7,000 रुपयांपर्यंतच्या ईएमआयच्या रेंजमध्ये तीन कार ऑफर केल्या जात असून यामध्ये क्विड (Kwid), Kiger आणि Triber यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती या लेखातून घेणार आहोत.

किती ईएमआय भरावा लागेल

रेनॉल्ट क्विड कंपनी आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेउन आली असून कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय कार्स केवळ 4999 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येणार आहेत. 4999 रुपयांचा ईएमआय 3.13 लाख रुपयांच्या कर्जावर आधारित असून यासाठी ग्राहकांना ८४ महिन्यांसाठी ४९९९ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. Renault Kwid 4.64 लाखांपासून ते 6.09 लाख रुपये एक्सशोरूम किंमतीपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ज्या ग्राहकांना सहा हजार रुपयांपर्यंतच्या ईएमआयवर कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी Renault Triber हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी ग्राहकांना ५९९९ रुपयांचा ईएमआय ८४ महिन्यांसाठी भरावा लागणार आहे. हा ईएमआय 3.75 लाख रुपयांच्या कर्जावर आधारित असून ग्राहकांना 84 महिन्यांसाठी 5999 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

94,000 पर्यंत सूट

सात हजार रुपयांपर्यंत ईएमआय भरणाऱ्यांसाठी रेनॉल्ट किगर हा एक चांगला पर्याय आहे. ही गाडी 6999 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी केली जाऊ शकते. हा ईएमआय 4.38 लाख रुपयांच्या कर्जावर आधारित असून ही कार खरेदी करणाऱ्याला ग्राहकांना 84 महिन्यांसाठी ईएमआय म्हणून 6999 रुपये भरावे लागतील.
रेनॉल्ट इंडिया भारतातील तिन्ही मास-मार्केट कारवर म्हणजेच Kwid, Triber आणि Kiger वर 94,000 पर्यंत सूट देत आहे. तीन रेनॉल्ट कारच्या ऑफरवरील फायद्यांमध्ये लॉयल्टी ऑफर तसेच एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत सर्व वाहनांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट देखील देत आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रायबरला सर्वाधिक ऑफर

कंपनीकडून रेनॉल्ट ट्रायबरला सर्वाधिक ऑफर दिली जात असून 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. लॉयल्टी ऑफर म्हणून 44,000 ची सुट देण्यात येत आहे. तसेच स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत 10,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. एकूणच, कंपनी या सबकॉम्पॅक्ट एमपीव्हीवर 94,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. क्विड फिलाहल ही रेनॉल्टची भारतातील सर्वात स्वस्त कार असून कंपनी या कारवर 35,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट देत आहे.
याशिवाय, लॉयल्टी ऑफर म्हणून 37,000 रुपयांपर्यंत सूट आहे. एक्सचेंज ऑफर म्हणून कंपनी 10,000 रुपयांची सूट देत आहे. ही सवलत Kwid 2021 मॉडेलवर उपलब्ध आहे. काईगरने अलीकडेच भारतात 50,000 युनिट्सचे प्रोडक्शन केले आहे. Renault Kiger वर 75,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. ५५,००० रुपयांपर्यंतचा लॉयल्टी लाभ मिळत आहे 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे.