होंडाच्या या दुचाकीची जोरदार विक्री… देशात ठरली नंबर 1 सेलिंग बाईक…

125 सीसी बाईकच्या विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी चांगली कामगिरी करुन 254.69 टक्क्यांची ग्रोथ मिळविली आहे. या दरम्यान, होंडा सीबी शाइनची सर्वाधिक विक्री झालेली दिसून येत आहे.

होंडाच्या या दुचाकीची जोरदार विक्री... देशात ठरली नंबर 1 सेलिंग बाईक...
होंडा सीबी शाइनImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 3:35 PM

भारतीय दुचाकी बाजारामध्ये सर्वाधिक विक्री 100 आणि 125 सीसीच्या बाईक्सची (100-125 cc bikes) होत असते. मे 2022 मध्ये 125 सीसी बाईकच्या विक्रीचे आकडे समोर आले आहेत. मे 2022 मध्ये विविध बाईक निर्मात्यांनी एकूण 2 लाख 38 हजार 626 बाईक्सच्या युनिट्‌सची विक्री केली आहे. तर मागील वर्षी मेमध्ये केवळ 67 हजार 278 युनिट्‌सची विक्री झाली होती. या वर्षी बाईक निर्मात्या कंपन्यांनी विक्रीमध्ये (selling) चांगली कामगिरी केली आहे. 125 सीसी बाईकच्या विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी चांगली कामगिरी करुन 254.69 टक्क्यांची ग्रोथ मिळविली आहे. या दरम्यान, होंडा सीबी शाइनची (Honda cb shine) सर्वाधिक विक्री झालेली दिसून येत आहे. होंडाने मे 2022 मध्ये सीबी शाइनच्या एकूण 1 लाख 19 हजार 765 युनिट्‌सची विक्री केली आहे.

होंडा सीबी शाइन

होंडा सीबी शाइन 125 सीसी सेंगमेंटमध्ये देशात सर्वाधिक विक्री होणारी बाइक ठरली आहे. सीबी शाइनने एप्रिल 2022 मध्ये विक्रीत पहिला क्रमांक मिळविला होता. मे 2022 मध्ये याची एकूण 1 लाख 19 हजार 765 युनिटची विक्री झाल आहे. 1 लाखांपेक्षा जास्त युनिट्‌सची विक्री करणारी होंडा सीबी शाइन ही एकमेव कार ठरली आहे.

बजाज पल्सर

देशात दुसरी सर्वात जास्त विक्री होणारी बाइक पल्सर ठरली आहे. मे 2022 मध्ये बजाज पल्सरची एकूण 56396 युनिटची विक्री झाली होती. मागील वर्षी मेमध्ये केवळ 28 हजार 636 युनिट्‌ची विक्री झाली होती. या वर्षी बजाज पल्सरची 27 हजार 760 युनिटची जास्त विक्री झाली आहे. पल्सरने आपल्या विक्रीमध्ये 96.94 टक़्क्यांची वाढ नोंदवली आहे.

हिरो स्प्लेंडर

देशातील सर्वात मोठी बाईक निर्माता हिरो मोटोकॉर्पने मे 2022 मध्ये हिरो स्प्लेंडरच्या एकूण 33 हजार 754 युनिट्‌सची विक्री केली आहे. कंपनीने मागील वर्षी मेच्या तुलनेत यंदा 105.92 टक्के चांगली ग्रोथ मिळविली आहे. हिरो स्प्लेंडरचे मार्केट शेअर 14.15 टक़्के इतके आहे. मे 2021 मध्ये हिरो स्प्लेंडरने एकूण 16 हजार 392 युनिट्‌सची विक्री केली होती.

हीरो ग्लॅमर

ही देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी बाइक ठरली आहे. मे 2022 मध्ये याची एकूण 28 हजार 363 युनिट्‌सची विक्री झाली आहे. तर दुसरीकडे मे 2021 मध्ये ग्लॅमरची एकूण 7 हजार 313 युनिटची विक्री झाली होती. या वर्षी 21 हजार 50 युनिट्‌स जास्तीची विक्री झाली आहे.

टीव्हीएस राइडर आणि केटीएम

मे 2022 मध्ये एकूण 344 युनिटच्या विक्रीसह टीव्हीस राइडर पाचव्या क्रमांकावर राहिली आहे. टीव्हीएस राइडरच्या विक्रीमध्ये 89.86 टक़्के घसरण झाली आहे. केटीएमची विक्रीदेखील 98.52 टक्क्यांनी कमी झाली आहे. मे 2021 मध्ये 271 युनिटच्या तुलनेत मे 2022 मध्ये केटीएमने केवळ चार युनिट विक्री केली आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.