Royal Enfield ने वाढवली ‘या’ बाईकची किंमत, जाणून घ्या

रॉयल एनफिल्डने आपल्या सर्वात क्लासिक आणि लोकप्रिय बाईक बुलेट 350 च्या किंमतीत बदल केला आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढल्याने बुलेटचे सर्व व्हेरियंट आता थोडे महाग झाले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.

Royal Enfield ने वाढवली ‘या’ बाईकची किंमत, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jun 19, 2025 | 4:47 PM

तुमच्या आवडत्या रॉयल एनफिल्डने आपल्या सर्वात क्लासिक आणि लोकप्रिय बाईक बुलेट 350 च्या किंमतीत बदल केला आहे. यामुळे आता ग्राहकांचे टेन्शन देखील वाढले आहे. आपल्या आवडच्या बाईकला घरी आणण्यात आता किंमत अडसर ठरू शकते, याविषयी पुढे विस्ताराने जाणून घ्या.

तुम्हाला बुलेटची आवड असेल आणि तुम्ही स्वत:साठी नवीन बुलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. ऑटोमेकर कंपनीने आपल्या काही बाइक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. ज्यात बटालियन ब्लॅक, मिलिटरी रेड ऑफ बुलेट 350 सारख्या व्हेरियंटचा समावेश आहे.

रॉयल एनफिल्डने आपल्या सर्वात क्लासिक आणि लोकप्रिय बाईक बुलेट 350 च्या किंमतीत बदल केला आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढल्याने बुलेटचे सर्व व्हेरियंट आता थोडे महाग झाले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. या व्हेरियंटची किंमत 2,000 रुपयांवरून 3,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

बटालियन ब्लॅक अँड मिलिटरी रेडची नवी किंमत काय?

बुलेट 350 च्या नवीन दरांबद्दल बोलायचे झाले तर आता त्याचे बटालियन ब्लॅक व्हर्जन 1.75 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध असेल, जे सर्वात स्वस्त मॉडेल बनले आहे. तर मिलिटरी ब्लॅक आणि मिलिटरी रेड सारख्या व्हेरियंटची किंमत आता 1.76 लाख रुपये झाली आहे. स्टँडर्ड व्हर्जन (ब्लॅक अँड मरून) ची किंमत आता 2 लाख रुपये आहे. मोस्ट प्रीमियम मॉडेल ब्लॅक गोल्डची नवी किंमत 2.18 लाख रुपये झाली आहे.

रॉयल एनफील्ड बुलेट 350 इंजिन

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच 349cc चे एअर ऑईल कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे 20.2 बीएचपी पॉवर आणि 27nm टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे, जो स्मूथ रायडिंगचा अनुभव देतो.

रॉयल एनफील्ड बुलेट 350 फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर बाइकमध्ये अ‍ॅनालॉग स्पीडोमीटरसह डिजिटल एलसीडी स्क्रीन मिळते जी ट्रिप्स, नेव्हिगेशन सारखी माहिती देते. यात यूएसबी चार्जिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिस्क ब्रेक, सिंगल/ड्युअल चॅनेल एबीएस, स्पोक व्हील्स आणि टेलिस्कोपिक फोर्क देण्यात आले आहेत.

रॉयल एनफील्ड बुलेट 350 मायलेज

मायलेजच्या बाबतीत ही बाईक एआरएआयनुसार 37 किमी प्रति लीटर देते. रस्त्यांनुसार प्रत्यक्ष मायलेजबद्दल बोलायचे झाले तर हा आकडा 3040 किमी/लीटरपर्यंत असू शकतो. याची 13 लिटरची टाकी भरल्यावर सुमारे 460+ किमी अंतर कापू शकते.