Royal Enfield च्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईकचा युरोप, ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड, जाणून घ्या किंमत आणि लेटेस्ट फीचर्स

| Updated on: Feb 04, 2022 | 10:55 AM

Royal Enfield ची लोकप्रिय क्रुझर बाईक (Cruiser Bike) रॉयल एनफील्ड न्यू क्लासिक 350 (Royal Enfield New Classic 350) ला केवळ भारतातच पसंत केले जात नाही तर परदेशातही ही बाईक लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

Royal Enfield च्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईकचा युरोप, ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड, जाणून घ्या किंमत आणि लेटेस्ट फीचर्स
New Royal Enfield Classic 350
Follow us on

मुंबई : भारतातील रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) लोकप्रियता कोणापासूनही लपून राहिलेली नाही आणि आता या चेन्नईस्थित बाईक कंपनीने मैलाचा दगड पार केला आहे. RE ची लोकप्रिय क्रुझर बाईक (Cruiser Bike) रॉयल एनफील्ड न्यू क्लासिक 350 (Royal Enfield New Classic 350) ला केवळ भारतातच पसंत केले जात नाही तर परदेशातही ही बाईक लोकांच्या पसंतीस उतरली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकचे नवीन मॉडेल सप्टेंबर 2021 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले. भारताव्यतिरिक्त, नवीन क्लासिक 350 थायलंड, फिलिपिन्स, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये उपलब्ध आहे.

Royal Enfield ने ब्रिटनमध्ये देखील नवीन Classic 350 चे बुकिंग सुरु केले आहे आणि त्याची संभाव्य डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरु होईल, त्यानंतर नवीन Royal Enfield Classic 350 तेथील रस्त्यांवर दिसेल. यूकेमध्ये उपलब्ध होणारी बाईकही भारतात मिळणाऱ्या मॉडेलसारखीच असेल.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे स्पेसिफिकेशन

न्यू-जेन क्लासिक 350 Meteor 350-सोर्स जे-प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. हे समान इंजिन, फ्रेम, सस्पेंशन आणि ब्रेक्स वापरते. याशिवाय, हे रॉयल एनफील्डच्या नवीन ट्रिपर टर्न बाय टर्न नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करते जे बाईकवर पर्यायी वैशिष्ट्य म्हणून उपलब्ध आहे.

क्लासिक 350 मध्ये शक्तिशाली इंजिन उपलब्ध

क्लासिक 350 मध्ये 349 सीसी, सिंगल-सिलेंडर, डीओएचसी इंजिन आहे जे आधी Meteor 350 वर देण्यात आले होते. कोणत्याही विशेष अपडेटशिवाय इंजिन क्लासिकसाठी वापरले गेले आहे. हे समान 20 PS पॉवर आणि 28 Nm टॉर्क वितरीत करत आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल युनिट समाविष्ट आहे. मोटारसायकल Redditch, Halcyon, Signals, Dark आणि top-spec Chrome अशा एकूण पाच ट्रिममध्ये उपलब्ध आहे. याची होंडा H’ness CB 350, Benelli Imperiale 400 आणि Jawa बाइक्सशी स्पर्धा सुरू आहे.

अपडेटेड रॉयल एनफील्ड क्लासिक 350 रेट्रो क्लासिक मोटरसायकलवर नवीन झूम प्लस आणि झूम प्लस एफ श्रेणीचे टायर्स पुरवतील. आता ब्रँडने नवीन क्लासिक के 350 च्या पर्यायी अॅक्सेसरीजच्या संपूर्ण श्रेणीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. अधिक खास आणि वैयक्तिक स्वरूपासाठी ग्राहक त्यांच्या मोटारसायकलींना रिफाइन करण्यासाठी अॅक्सेसरी किट वापरू शकतात. रॉयल एनफील्डच्या ऑनलाइन स्टोअरवर हे अॅक्सेसरीज विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

रॉयल एनफील्ड न्यू क्लासिक 350 ची किंमत

अलीकडेच रॉयल एनफिल्डने त्यांच्या बाईक्सच्या किंमतीत वाढ केल्याची घोषणा केली होती. तेव्हा या बाईकची सुरुवातीची किंमत 1.87 लाख रुपये होती. वेगवेगळ्या व्हेरियंटच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर Redditch व्हेरिएंटची किंमत 1,87,246 रुपये आहे. त्याच वेळी, Halcyon व्हेरिएंटची किंमत 1.95 लाख रुपये आहे, तर नवीन Classic 350 च्या Signals व्हेरिएंटची किंमत 2,07,509 रुपये आहे. बाईकच्या डार्क आणि क्रोम व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 2,14,743 रुपये आणि 2,18,450 रुपये आहे.

इतर बातम्या

तुमच्या मनात कारचं स्वप्न असेल तर तुमची गाडी तुम्हाला म्हणतेय ‘गाडी बुला रही है…’; किंमत फक्त…

ऑटो इंडस्ट्रीत कहीं खुशी कहीं गम, जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर, Mahindra, Tata ची शानदार सुरुवात

लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज

(Royal Enfield Classic 350 sets new record, Sold in UK and Australia)