AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑटो इंडस्ट्रीत कहीं खुशी कहीं गम, जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर, Mahindra, Tata ची शानदार सुरुवात

ऑटो सेक्टरने (Auto Sector) जानेवारी 2022 मधील वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. ही आकडेवारी पाहता महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) या दोन भारतीय कंपन्यांसह निस्सान इंडियाने नव्या वर्षाची धडाक्यात सुरुवात केली आहे.

ऑटो इंडस्ट्रीत कहीं खुशी कहीं गम, जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर, Mahindra, Tata ची शानदार सुरुवात
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Feb 03, 2022 | 8:00 AM
Share

मुंबई : ऑटो सेक्टरने (Auto Sector) जानेवारी 2022 मधील वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. ही आकडेवारी पाहता महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) या दोन भारतीय कंपन्यांसह निस्सान इंडियाने नव्या वर्षाची धडाक्यात सुरुवात केली आहे. तर मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या देशातील सर्वात मोठ्या वाहन निर्मात्या कंपनीच्या विक्रीत घट नोंदवण्यात आली आहे. तसेच Hyundai आणि Honda या कंपन्यांच्या विक्रीतदेखील घट झाली आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) जानेवारी 2022 मध्ये वाहन विक्रीत 27 टक्के वाढ केली आहे, तर मारुती सुझुकीला मात्र या काळात फटका बसला आहे. मारुती सुझुकी इंडियाची (MSI) घाऊक विक्री जानेवारी 2022 मध्ये 3.96 टक्क्यांनी घसरून 1,54,379 युनिट्सवर आली आहे. मारुतीने मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 1,60,752 वाहनांची विक्री केली. याशिवाय, कंपनीची देशांतर्गत विक्री गेल्या महिन्यात 8 टक्क्यांनी घसरून 1,36,442 वाहनांवर आली, गेल्या वर्षातील याच महिन्यात 1,48,307 होती.

वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ची एकूण विक्री जानेवारी 2022 मध्ये 19.55 टक्क्यांनी वाढून 46,804 युनिट्स झाली आहे. महिंद्राने वर्षभरापूर्वी याच महिन्यात 39,149 वाहनांची विक्री केली होती. कंपनीने सांगितले की जानेवारी 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात 19,964 युनिट्सची विक्री झाली होती, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 20,634 युनिट्सची विक्री झाली होती. याशिवाय, जानेवारी 2022 मध्ये कंपनीच्या व्यावसायिक वाहनांची विक्री 23,979 युनिट्सपर्यंत वाढली आहे. एका वर्षापूर्वी याच महिन्यात कंपनीने या सेगमेंटमध्ये 16,229 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने सांगितले की गेल्या महिन्यात त्यांची निर्यात 2,861 युनिट्स होती, जी मागील वर्षी याच महिन्यात 2,286 युनिट्स होती.

Hyundai Motor India च्या विक्रीत घट

वाहन कंपनी Hyundai Motor India ची एकूण विक्री जानेवारी 2022 मध्ये 11.11 टक्क्यांनी घसरून 53,427 युनिट झाली. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 60,105 वाहनांची विक्री केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात त्यांची देशांतर्गत विक्री 15.35 टक्क्यांनी घसरून 44,022 युनिट्स इतकी झाली आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात 52,005 मोटारींची विक्री झाली होती. याशिवाय जानेवारी 2022 मध्ये कंपनीची निर्यात 9,405 युनिट्सपर्यंत वाढली आहे. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 8,100 युनिट्सची निर्यात केली होती.

निसान इंडिया नफ्यात

निसान इंडियाने जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीने या वर्षाच्या पहिल्या महिन्यात 4,250 युनिट्सची घाऊक विक्री केली असून, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 5 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. जपानी ब्रँडने निसान आणि डॅटसन वाहनांच्या 1,224 युनिट्सची भारतातून परदेशात निर्यात केली. कंपनी सध्या भारतातून नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, युगांडा, झांबिया, केनिया, सेशेल्स, मोझांबिक, मॉरिशस, ब्रुनेई, टांझानिया आणि मलावीसह 15 देशांमध्ये आपले प्रोडक्ट्स निर्यात करते.

होंडा कार्स इंडियाच्या विक्रीत घट

Honda Cars India ची जानेवारी 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात वर्ष-दर-वर्ष (YoY) विक्री 7.88 टक्क्यांनी घसरून 10,427 युनिट्सवर गेली आहे, कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात 11,319 युनिट्सची विक्री केली होती. याच कालावधीत कंपनीची निर्यात 39.65 टक्क्यांनी वाढून 1,722 युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 1,233 युनिट्सची होती. एकंदरीत (देशांतर्गत आणि निर्यातीसह), कंपनीने जानेवारी 2022 मध्ये 12,149 युनिट्सची विक्री केली, जी जानेवारी 2021 मध्ये 12,552 युनिट्सच्या तुलनेत 3.2 टक्क्यांनी कमी आहे.

टोयोटाच्या विक्रीत 34 टक्के वाढ

जानेवारी 2022 मध्ये, टोयोटा इंडियाने 7,328 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. जानेवारी 2021 च्या विक्रीशी तुलना करता, कंपनीने यावेळी 34 टक्के वाढ नोंदवत 11,126 युनिट्सची विक्री केली आहे.

इतर बातम्या

Budget 2022: केंद्र सरकार EV चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करणार!

Maruti Ertiga ला टक्कर देणारी Kia ची नवी कार या महिन्यात लाँच होणार, काय असेल खास?

Kia ते Toyota, पाहा पुढील दोन महिन्यांत भारतात लाँच होणाऱ्या गाड्या

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.