Innova आणि Ertiga कारशी मोठी स्पर्धा, HYUNDAI आणतेय 7- आसनी कार

हुंडई कंपनी लवकरच बाजारात सात आसनी कार लाँच करणार आहे. ही कार एमपीव्ही असणार असून या कारची स्पर्धा मारुती सुझुकीच्या एर्टिंगा आणि इनोव्हाशी असणार आहे.

Innova आणि Ertiga कारशी मोठी स्पर्धा, HYUNDAI आणतेय 7- आसनी कार
HYUNDAI SEVEN SEATER CAR
| Updated on: Nov 28, 2026 | 10:31 PM

हुंडई कंपनी भारतात अनेक कार आणत आहे. साल २०३० पर्यंत कंपनी भारतात २६ कार लाँच करणार असल्याची घोषणा मागे या कंपनीने केली होती. यातील काही अपडेट्स आणि काही नवीन नावे देखील सामील होतील. या यादीत आता चर्चा एका नव्या सात सीटर कारची होत आहे. ही कार मारुती सुझुकीच्या एर्टिगाच नव्हे तर टोयोटाच्या इनोव्हाशी स्पर्धा करणार आहे.

HYUNDAI कंपनीने आय 1आय (Ki1i) कोडनेम वाली एक एमपीव्ही तयार केल्याचे ऑटोकार इंडियाने म्हटले आहे. ही हुंडईची भारतीय बाजारातील पहिली एमपीव्ही कार असणार असून तिची थेट स्पर्धा टोयोटा इनोव्हा कारशी होणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने कन्फर्म केले होते की ती आपल्या भारतीय पोर्टफोलियोत एक एमपीव्ही कार जोडणार आहे.

Loading...

या कारमध्ये काय खास ?

हुंडईच्या अपकमिंग कार सी-सेगमेंटची एमपीव्ही असणार आहे. यात फिचर्स भरपूर आहेत. ही मारुती सुझुकीच्या एर्टिगाच्या वरची सेगमेंटची कार होणार आहे. ही कार हुंडईच्या सध्या सँटा-फे वाल्या एन 3 प्लेटफॉर्मवर आधारित असू शकते. हुंडईच्या इतर कारप्रमाणे यात कम्फर्ट आणि फिचर्सची खास काळजी घेतली जाणार आहे.

डिझेल इंजिनाच्या सोबत लाँच?

या कारमध्ये पॅनोरोमिक सनरूफ, डुअल स्क्रीन,व्हेंटिलेटेड सीट्स, लेव्हल 2 एडास आणि इतर फिचर्स मिळतील. सध्या कारच्या पॉवरट्रेनची माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या कारला डिझेलच्या इंजिनात लाँच केले जाण्याची चर्चा आहे.

या कारमध्ये वेन्यू आणि क्रेटामध्ये मिळणारे 1.5 लीटरचे डीझेलचे इंजिन मिळू शकते. हे इंजिन 117 हॉर्स पॉवर जनरेट करेल. साल 2027 मध्ये टोयोटाची इनोवा क्रिस्टा डिस्कंटिन्यू झाल्यानंतर डिझेलचा जो गॅप सेगमेंट तयार होईल त्याला भरण्यासाठी या कारला डिझेल इंजिनासह लाँच केले जाऊ शकते.

एका दशकाहून ही जास्त जुनी झाल्यानंतरही इनोव्हा क्रिस्टा लोकांची आवडती कार आहे. याचे सक्सेसर मॉडेल इनोव्हा हायक्रॉस असून जे पेट्रोल, फ्लेक्स फ्युअल हायब्रिड आणि हायब्रिड अवतारात मिळते. ही कार डिझेलमध्ये येत नाही आणि हुंडई या गॅपला भरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us