AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्धा तास रस्त्यावरच तडफडत राहिला… ‘हिट अँड रन’ने नवी मुंबई हादरली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

नवी मुंबईतील पाम बीचवर भरधाव वाहनाने तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चालक फरार झाला आहे. रुग्णवाहिकेसाठी 30 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली असल्याचा आरोप नागरिकांनी केला. वेळेत उपचार न मिळाल्याने तरुण दगावल्याचं स्थानिक म्हणालेत.

अर्धा तास रस्त्यावरच तडफडत राहिला... 'हिट अँड रन'ने नवी मुंबई हादरली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Palm Beach Road, Hit And RunImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 10:19 PM
Share

नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव अज्ञात वाहनाने स्कूटीस्वार तरुणाला धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून पसार झाला. या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आणखी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यानस मृत तरुणाची ओळख अद्याप समोर आलेली नाही.

नेमकं काय घडलं?

नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भरधाव अज्ञात वाहनाने स्कूटीस्वार तरुणाला जोरदार धडक दिली. वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातानंतर जखमी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत 108 क्रमांकावर रुग्णवाहिका आणि 112 क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला.मात्र, तब्बल अर्धा तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करूनही ती वेळेत पोहोचली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांचे गंभीर आरोप

नवी मुंबईमध्ये नागरिकांचे हे हाल आहेत. रुग्णवाहिकांवाल्यांनी त्यांच्या युनियन बनवल्या आहेत. रात्रीची वेळ आहे. चालक नाही, अशा स्वरुपाची कारणं देतात. इतर रुग्णवाहिकांना परिसरात येऊ देत नाहीत. इमर्जन्सीमध्ये फोन केल्यावरही ते येत नाहीत. याला काय अर्थ आहे. माझ्या मागे हा माणूस दिसतोय. तो अर्धा तासापासून तिथेच पडून आहे. बिचाऱ्याला वेळेवर मदत मिळाली असती तर आता तो जिवंत असता, असं स्थानिकांनी सांगितलं. पोलिस घटनास्थळी पोहोचलेत त्यांनी रुग्णवाहिका बोलवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत, असं सांगत वस्तुस्थिती किती भयंकर आहे, असं यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगत आता मेल्यावर रुग्णवाहिका येत आहे. अशा युनियनवाल्या रुग्वाहिका आणि त्यांच्या चालकांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी स्थानिक प्रवाशांनी केली.

दरम्यान, नवी मुंबईमध्ये ताज्या आकडेवाडीनुसार दिवसाला दररोज 2 अपघात होत असल्याची नोंद आहे. तर वार्षिक आकडेवारी 750 ते 780 इतकी आहे. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर दाखल होणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!