Suzuki Ginny : सुझुकी जिग्नी 4Sport लवकरच होणार लाँच, कंपनी काढेल मर्यादित गाड्या, फक्त 100 कारची होणार विक्री

| Updated on: Jul 27, 2022 | 10:30 PM

सुझुकी जिम्नीची लोकप्रीयता जगात पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, कंपनीने जिम्नी 4Sport ला ब्राझीलमध्ये लाँच करण्याची घोषणा केली. 4Sport मॉडल जिम्नी सियराच्या ऑफ-रोड व्हर्जनसारखी दिसत आहे. विक्रीसाठी फक्त 100 कार बाजारात उतरविण्यात येणार आहेत.

Suzuki Ginny : सुझुकी जिग्नी 4Sport लवकरच होणार लाँच, कंपनी काढेल मर्यादित गाड्या, फक्त 100 कारची होणार विक्री
सुजुकी जिग्नी 4Sport लवकरच होणार लाँच
Follow us on

सुझुकीने जिम्नीचे 4Sport मॉडल बाजारात आणण्याची घोषणा केली. कंपनी जिम्नी 4Sport च्या मर्यादित कार म्हणजे फक्त 100 कारची विक्री करणार आहे. सुझुकी येणाऱ्या जिम्नीला ब्राझीलमध्ये (Brazil) लाँच करेल. सुझुकीची नवी कार जिम्नी सियरा थोडा जास्त ऑफ-रोड एडिशन (Off-road edition) लागतो. कंपनी 4Sport एडिशनमध्ये काही बदलाव आणेल. युजर्सला नवी जिम्नीमध्ये पहिल्यापेक्षा आता ऑफ-रोड अनुभव मिळण्याची शक्यता आहे. लिमिटेड एडिशन असल्यानं जिग्मी सर्वात महाग मॉडल राहू शकते. वाचा जिम्नी 4Sport चे वैशिष्ट्ये आणि फिचर्स (features). सुझुकी जिम्नीची लोकप्रीयता जगात पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, कंपनीने जिम्नी 4Sport ला ब्राझीलमध्ये लाँच करण्याची घोषणा केली. 4Sport मॉडल जिम्नी सियराच्या ऑफ-रोड व्हर्जनसारखी दिसत आहे. विक्रीसाठी फक्त 100 कार बाजारात उतरविण्यात येणार आहेत.

पाण्यावर चालण्याची क्षमता

नवी जिग्मी 4Sport मध्ये सर्वात नवी बाब म्हणजे समोर स्नोर्कल आहे. याच्या मदतीने जिम्नीची पाण्यावर उतरण्याची क्षमता जवळपास 600 मिमी वाढते. ही काही कमी क्षमता नाही. 4Sport लिमिटेड एडिशन दुसरी लक्षणीय बाब म्हणजे रॉक स्लाइडर आहे. यात चंकी ट्युबलर फ्रेम राहते. त्यात जिम्नीचे दोन्ही बाजूला बोल्ट केलं जाते. रॉक स्लाइडर काळ्या रंगात दिलंय.

रॉक स्लाइडर आणि ब्लू हाईलाइट

जिम्नी 4Sport मध्ये रॉक स्लाइडर दोन प्रकार काम करते. स्लाइडर कार फुटस्टेपसारखी काम करते. रॉक स्लाइडर पहाडांवर दगडांपासून संरक्षण करते. सुजुकीनं नव्या जिम्नीमध्ये लाइट ब्लू हाईलाइटचा वापर केलाय. जिम्नीमध्ये दोरी बांधायला आणि मागे लाइट ब्लू रंगाचे दोन हूक असतील. दरवाज्यावर 4Sport ब्राँड ब्लू कलरचा आहे.

हे सुद्धा वाचा

इंटेरीअर आणि इंजीन स्पेसीफिकेशन्स

सुझुकी जिम्नी 4Sport च्या सर्कुलर एसी वेंट आणि गेर सेलेक्टरवर ब्लू कलर दिसतो. नवी जिम्नीची ब्लॅक छतावर ब्लॅक कलरमध्ये एक रुफ रँक आहे. रूफ रँकवर 4Sport चा ब्राँड दिलाय. नव्या जिम्नीमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजीन मिळेल. आता पाहावं लागले की, ब्राझीलमध्ये लाँच झाल्यानंतर जिम्नी 4Sport भारतात केव्हापर्यंत येणार.