टाटांची कमाल, देशात प्रथमच अशी गाडी लॉन्च

Tata Tiago and Tigor iCNG AMT Launched | टाटा कंपनीने नवीन कारसाठी काही नवीन रंग आणले आहेत. टाटा टियागोसाठी टोर्नाडो ब्लू, टियागो एनआरजीसाठी ग्रासलँड बेज आणि रेग्यूलर टिगोरसाठी मेट्योर ब्रँझ रंगाचा पर्याय दिला आहे.

टाटांची कमाल, देशात प्रथमच अशी गाडी लॉन्च
Tata Motors
| Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 6:53 PM

नवी दिल्ली, दि. 8 फेब्रुवारी 2024 | टाटा ग्रुप देशाला नवनवीन देण्यात नेहमीच अग्रसेर असतो. यामुळे टाटा ग्रुपच्या प्रत्येक नवीन प्रॉडक्टची चर्चा होत असते. टाटा ग्रुपने मध्यमवर्गींसाठी नॅनो कार लॉन्च केली होती. या कारची चर्चा काही वर्ष होत होती. आज सर्वसामन्यांच्या दारापुढे नॅनो कार दिसत असते. आता टाटा ग्रुपने अजून एक कमाल केली आहे. आजपर्यंत जे कोणालाच जमले नाही, ते टाटा ग्रुपने तयार करुन दाखवले आहे. देशातील प्रमुख वाहन उद्योजक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने देशातील पहिली ऑटोमेटिक CNG कार रेंज लॉन्च केली आहे.

सर्वात स्वस्त हॅचबॅक कार

टाटा मोटर्सने सर्वात स्वस्त हॅचबॅक Tiago CNG AMT आणि सेडान कार Tigor CNG AMT लॉन्च केली आहे. या गाडीत ऑटोमेटिक ट्रॅन्समिशन गिअरबॉक्स आहे. नवीन सीएनजी ऑटोमेटिक कारच्या किंमतीची सुरुवात केवळ 7.89 लाख रुपयांपासून सुरु झाली आहे. Tiago iCNG AMT ने ऑटोमेटिक व्हेरियंटची 7,89,900 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. कंपनीने या गाड्यांचे चार ट्रिम सादर केले आहे.
त्यात पहिल्या XZA NRG ट्रिमची किंमत 8,79,900 लाख रुपये आहे.

Tigor iCNG AMT चे दोनच ट्रिम

Tigor iCNG AMT ऑटोमेटिकमध्ये दोनच ट्रिम लॉन्च केले आहे. त्यात बेस व्हेरियंटची किंमत 8,84,900 रुपये आहे तर टॉप व्हेरियंटची किंमत 9,54,900 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

अशा आहेत किंमती

  • Tiago iCNG AMT च्या किंमती आणि व्हिरियंट
  • XTA 7,89,900
  • XZA+ 8,79,900
  • XZA+ DT 8,89,900
  • XZA NRG 8,79,900

 

  • Tigor iCNG AMT च्या किंमती आणि व्हिरियंट
  • XZA 8,84,900
  • XZA+ 9,54,900

किती आहे मायलेज

टाटा मोटर्सचा दावा आहे की, या ऑटोमॅटिक सीएनजी कार 28.06 किमी/किलोपर्यंत मायलेज देत आहेत. टाटा कंपनीने काही नवीन रंग आणले आहे. टाटा टियागोसाठी टोर्नाडो ब्लू, टियागो एनआरजीसाठी ग्रासलँड बेज आणि रेग्यूलर टिगोरसाठी मेट्योर ब्रँण्झ रंगाचा पर्याय दिला आहे.