Tata Tiago vs Maruti Celerio : मायलेज की सुरक्षा ? कोणती कार घेणे चांगले ? वाचा डिटेल्स
Tata Tiago Vs Maruti Celerio:टाटा टीयागो आणि मारुती सेलेरिओ या दोन कारपैकी कोणती कार जास्त स्वस्त आणि चांगला मायलेज देणारी आहे.या कारची किंमत, फिचर्स आणि परफॉर्मेंसच्या बाबतीत जाणून घेऊयात....

भारतीय बाजारात ग्राहकांना कारच्या बाबतीत कमी किंमती जादा मायलेज देणाऱ्या कार पसंद पडत असतात. जर तुम्हाला स्वस्त आणि चांगली कार हवी असेल तर आम्ही येथे टाटा टियागो सीएनजी आणि मारुती सेलेरिओ या दोन कारच्या बाबतीत माहिती देत आहोत. किंमत, फिचर्स आणि मायलेज कळळ्यानंतर तुम्हीच अंदाज लावू शकता की यातील कोणती कार तुमच्यासाठी योग्य आहे.
टाटा टियागो सीएनजीची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत सुमारे ६ लाख रुपये आहे. आणि याचा टॉप व्हेरिएंट ८.७५ लाख रुपयांपर्यंत येतो. ही कार चार प्रकारात XE, XM, XT आणि XZ+ उपलब्ध आहे. यात ऑटोमेटिक ट्रान्समिशन (AMT ) चा पर्याय एक अनोखी निर्मिती आहे. दुसरीकडे मारुती सेलेरिओ सीएनजी ( Maruti Celerio CNG )केवळ एकाच (VXI) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. हीची किंमत ६.९० लाख रुपये ( एक्स-शोरुम ) आहे.
कोणाचा मायलेज आहे सर्वात चांगला ?
Tata Tiago CNG या कारचा मायलेज मॅन्युअल मोडमध्ये २६.४९ किमी/किलोग्रॅम आणि ऑटोमेटीक मोडमध्ये २८ किमी/किलोग्रॅम आहे. रियल वर्ल्ड ड्रायव्हींगमध्ये हा सरासरी २४-२५ km/kg देतो. जो शहरी ट्रॅफीकसाठी पुरेसा आहे. तर मारुती सेलेरिओ सीएनजी चा क्लेम्ड मायलेज ३५.६० किमी/किलोग्रॅम इतका आहे. हा आकडा यास फ्युएल एफिशिएंसीच्या बाबती एकदम पुढे नेतो. डेली कम्युटर्स यासाठी हा एक मोठा फायदा ठरू शकतो. इंधनाचा दराचा आकडा पाहिल्यास हे तुम्हाला पटेल.
फिचर्स आणि इंटेरिअर
Tiago CNG एक फिचर पॅक्ड कार आहे. यात LED DRL सह प्रोजेक्टर डेडलॅम्प आहे, १०.२५ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. याशिवाय ट्वीन सिलिंडर टेक्नॉलॉजीच्या कारणाने बूट स्पेस देखील अन्य सीएनजी कारपेक्षा जादा आहे.
Celerio CNG देखील एक आधुनिक कार आहे. यात ७ इंचाचा टच स्क्रीन, Apple CarPlay, Android Auto, पुश-बटन स्टार्ट, आणि पॉवर विंडोची सुविधा आहे. परंतू यात एएमटी ऑप्शन नाही आणि बूट स्पेस देखील टियागोसारखी नाही.
सेफ्टीच्या बाबती कोणती कार सुरक्षित?
सेफ्टीच्या बाबतीत Tata Tiago CNG ला ग्लोबल NCAP ४ – स्टार रेटींग मिळालेली आहे. यात ड्युएल एअरबॅग,ABS, EBD, रिअर कॅमेरा, सीएनजी लिक डिटेक्शन सिस्टीम आणि मायक्रो-स्विच सारखे आधुनिक फिचर्स देण्यात आले आहे.
तर मारुती सेलेरिओ सीएनजी ( Maruti Celerio CNG )आता ६ एअर बॅगसह येते. हा एक मोठा अपग्रेड आहे. मात्र या कारचा क्रॅश टेस्ट रेकॉर्ड इतका चांगला मजबूत नाही जेवढा टाटा टीयागोचा आहे. त्यामुळे सुरक्षित ड्रायव्हिंगच्या बाबतीत टीयागो एक पाऊल पुढे आहे.
