Royal Enfield । रॉयल एनफिल्डची बाजारात धूम, विक्रीत जबरदस्त वाढ, या बाईकला आहे जास्त मागणी

| Updated on: Apr 02, 2021 | 11:46 AM

गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने केवळ 32,630 वाहनांची विक्री केली होती. त्याचबरोबर कंपनीने या कालावधीत 5,885 वाहनांची निर्यात केली आहे, जी गेल्या वर्षी मार्च महिन्यात फक्त 3,184 वाहने होती. (The huge increase in sales of Royal Enfield in the market, this bike is in high demand)

Royal Enfield । रॉयल एनफिल्डची बाजारात धूम, विक्रीत जबरदस्त वाढ, या बाईकला आहे जास्त मागणी
रॉयल एनफिल्डची बाजारात धूम, विक्रीत जबरदस्त वाढ
Follow us on

नवी दिल्ली : नवीन महिन्याच्या सुरूवातीस, वाहनधारकांनी त्यांचे विक्री अहवाल सादर करण्यास सुरवात केली आहे. मार्चचा महिना हा देशातील आघाडीच्या परफॉर्मन्स बाईक निर्माता रॉयल एनफिल्ड(Royal Enfield)साठी अधिक चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार मार्च महिन्यात कंपनीने एकूण 60,173 वाहने विकली आहेत, जी मागील वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत 84 टक्के जास्त आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने केवळ 32,630 वाहनांची विक्री केली होती. त्याचबरोबर कंपनीने या कालावधीत 5,885 वाहनांची निर्यात केली आहे, जी गेल्या वर्षी मार्च महिन्यात फक्त 3,184 वाहने होती. कंपनीला निर्यात व्यवसायाची गरज असते, कारण कंपनीला केवळ इतर देशांमध्ये उपस्थिती हवी असते असे नाही तर जागतिक बाजारातील मिड सेगमेंटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करु इच्छिते. (The huge increase in sales of Royal Enfield in the market, this bike is in high demand)

या सेगमेंटची सर्वाधिक मागणी

कंपनीच्या एकूण विक्री आकडेवारीवर नजर टाकल्यास जास्तीत जास्त मागणी 350cc सेगमेंटची आहे. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये सर्वाधिक विक्री 88.51 टक्के या सेगमेंटच्या बाईकची आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीची Classic, Meteor, Electra आणि बुलेट सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. 650 सीसी सेगमेंटमध्ये कंपनीच्या कॉन्टिनेंटल जीटी आणि इंटरसेप्टर्सचा समावेश आहे, जिची एकूण विक्रीमध्ये 11.49 टक्के भागीदारी आहे.

फेब्रुवारीमध्ये 5 टक्के घट

कंपनीने वार्षिक विक्रीत वाढ नोंदविली आहे, दुसरीकडे यंदाच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत विक्रीमध्ये सुमारे 5 टक्क्यांनी घट पहायला मिळाली. गेल्या फेब्रुवारीमध्ये कंपनीने एकूण 69,659 वाहनांची विक्री केली. परंतु गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत निर्यात व्यवसायात वाढ पहायला मिळाली. गेल्या फेब्रुवारीमध्ये कंपनीने केवळ 4,545 वाहनांची निर्यात केली होती.

लवकरच नेक्स्ट जनरेशन बाजारात

350 सीसी सेगमेंट कंपनीने नुकतीच आपली क्रूझर बाईक Meteor बाजारात आणली. परंतु अद्याप या सेगमेंटची लिडर Classic 350 कायम आहे. ही कंपनीची सर्वाधिक विक्री करणारी बाईक आहे. कंपनी लवकरच त्यांचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल बाजारात आणणार आहे, ज्याची अनेक वेळा चाचणी दरम्यान झलक पहायला मिळाली आहे. या दुचाकीशी संबंधित काही तपशीलही समोर आले आहेत. (The huge increase in sales of Royal Enfield in the market, this bike is in high demand)

इतर बातम्या

येत्या काही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागणार, महापौरांचे मोठे संकेत

RBI चे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल आता बिस्किट बनवणाऱ्या कंपनीची जबाबदारी सांभाळणार