फॅमिलीच्या सेफ्टीसाठी असुरक्षित या लोकप्रिय कार, क्रॅश टेस्टमध्ये ० रेटिंग
Family Crash Test: कारच्या सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी Global NCAP ही संस्था क्रॅश टेस्ट करत असते आणि याच्या आधारे कारना ० ते ५ स्टार पर्यंत रेटिंग दिली जाते. काही कार या टेस्टमध्ये फेल गेल्या आहेत. कोणत्या ते पाहूयात...

आजच्या काळात चार चाकी वाहनाचा वापर प्रचंड वाढला आहे. भारतातील कार मार्केट तर बूममध्ये आहे. मात्र, अलिकडे भारतीय ग्राहकांचा कल केवळ स्वस्त कार न घेता सुरक्षित कार घेण्याकडे चालला आहे. कारची सेफ्टी रेटिंग देणारी संस्था Global NCAP (GNCAP) क्रॅश टेस्ट करत असते. त्या आधारे कारना ० ते ५ स्टार दरम्यान रेटिंग दिली जाते. जर एखाद्या कारला ० स्टार रेटिंग मिळाली असेल तर या कार अपघाताच्या वेळी प्रवाशांना योग्य सुरक्षा देऊ शकणार नाहीत असे म्हटले जाते. या लेखात आपण अशा कार संदर्भात माहिती घेणार आहोत.
Citroen e-C3
Citroën e-C3 ही एक इलेक्ट्रिक हॅचबॅक कार आहे. मात्र, सुरक्षेच्या बाबतीत हीची कामगिरी चांगली नाही. Global NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला एडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शसाठी ० स्टार आणि मुलांच्या सुरक्षेसाठी केवळ १ स्टार मिळाले आहे. टेस्टमध्ये आढळले की हीचे बॉडी स्ट्रक्चर कमजोर आहे. साईड टक्कर झाल्यास ही कार प्रवाशांना पुरेशी सुरक्षा देत नाही.
Maruti Suzuki Eeco
Maruti Suzuki Eeco ही एक पॉप्युलर फॅमिली आणि कमर्शियल व्हॅन आहे. मात्र, सेफ्टी टेस्टमध्ये ही कमजोर सिद्ध झाली आहे. या कारला देखील Global NCAP मध्ये ० स्टार रेटिंग मिळाली आहे. बातमीनुसार यात एअरबॅग असूनही ड्रायव्हरच्या छातीला आणि गुडघ्याला जखम लागण्याचा धोका जास्त आहे. या कारचा बॉडी शेल देखील मजबूत नसल्याचे आढळले. त्यामुळे अपघाताच्या वेळी सुरक्षा मिळत नाही.
Maruti Suzuki S-Presso
Maruti Suzuki S-Presso कारला सुरुवातीला ० स्टार मिळाले होते. मात्र, यात सुधारणा करुन १ स्टार रेटिंग देण्यात आले आहे. आता यात ड्युअल एअरबॅग स्टँडर्ड देण्यात आले आहे. तरीही हीचे बॉडी स्ट्रक्चर आणि फुटवेल एरिया अजून पूर्णपणे मजबूत मानला जात नाही. वेगात असतान टक्कर झाल्यास सुरक्षा कमी मिळते.
Renault Kwid
Renault Kwid कार तिची डिझाईन आणि स्वस्त किंमत त्यामुळे खूपच लोकप्रिय आहे. मात्र, सेफ्टीच्या बाबतीत मात्र मागे आहे. या कारला Global NCAP मध्ये १ स्टार मिळाला आहे. बातमीनुसार यात ड्रायव्हरच्या डोक्यास संरक्षण योग्य असले तरी छाती आणि पायांची सुरक्षा कमजोर आढळली आहे.
Mahindra Bolero Neo
Mahindra Bolero Neo कारला मजबूत सुव्ह मानले जाते. मात्र, क्रॅश टेस्टमध्ये हिची कामगिरी कमजोर राहिली आहे. या कारला देखील केवळ १ स्टार रेटिंग मिळाली आहे. यात साईड इम्पॅक्ट आणि मुलांच्या सुरक्षे संदर्भात कमी रेटिंग देण्यात आली आहे. बाहेरुन मजबूत दिसूनही सुरक्षा मानकांच्या दुष्टीने ही कार मजबूत नसल्याचे उघड झाले आहे.