कमी किंमतीत दमदार फीचर्स, ‘या’ टॉप 5 स्कूटर्सना देशात सर्वाधिक पसंती

| Updated on: Jul 26, 2021 | 7:47 AM

आज आम्ही तुमच्यासाठी 5 अशा स्कूटर घेऊन आलो आहोत, ज्यांना देशातील ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. (Top 5 scooters in India)

कमी किंमतीत दमदार फीचर्स, ‘या’ टॉप 5 स्कूटर्सना देशात सर्वाधिक पसंती
Follow us on

मुंबई : भारतात सुरुवातीपासूनच स्कूटर्सचा चांगली पसंती मिळत आली आहे. अशा परिस्थितीत काही वर्षांपासून बऱ्याच कंपन्या निरंतर निरनिराळ्या प्रकारच्या स्कूटर लाँच करत आहेत. ही वाहने अत्यंत आरामदायक आणि सुरक्षित मानली जातात. त्याच वेळी, त्यांची अद्ययावत (अपडेटेड) आवृत्ती म्हणजेच इलेक्ट्रिक व्हर्जन देखील येऊ लागले आहे. दरम्यान, आज आम्ही तुमच्यासाठी 5 अशा स्कूटर घेऊन आलो आहोत, ज्यांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. (Top 5 scooters as per highest number of sales in India)

होंडा अ‍ॅक्टिव्हा (Honda Activa) – या स्कूटरमध्ये तुम्हाला 110 सीसी आणि 125 सीसीचा पर्याय मिळेल. दोन्ही मिळून या स्कूटरच्या एकूण 1,09,678 युनिट्सची विक्री झाली आहे. या स्कूटीची किंमत 67,843 रुपये इतकी आहे.

सुझुकी अ‍ॅक्सेस 125 (Suzuki Access 125) – या स्कूटरच्या 53,285 युनिट्सची विक्री झाली आहे. यामध्ये तुम्हाला तीन व्हेरिएंट्स मिळतील. ज्यामध्ये स्टँडर्ड, एसई आणि ब्लूटूथचा समावेश आहे. या स्कूटरची किंमत 71 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत आहे.

टीव्हीएस ज्युपिटर 110 (TVS Jupiter 110) – एप्रिल महिन्यात या स्कूटरच्या 25,570 युनिट्सची विक्री झाली आहे. या स्कूटरची किंमत 66,662 रुपयांपासून सुरू होते, या स्कूटरच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 73,770 रुपये इतकी आहे. यामध्ये आपल्याला बरेच दमदार फीचर्स मिळतील.

हीरो प्लेजर प्लस (Hero Pleasure Plus) – सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सच्या यादीत हिरोला पाचवं स्थान मिळालं आहे. कंपनीच्या Hero Pleasure Plus या स्कूटरलाही चांगली मागणी आहे. एप्रिलमध्ये कंपनीने या स्कूटरच्या 18,298 युनिट्सची विक्री केली आहे. या स्कूटरची किंमत 58,900 रुपयांपासून सुरू होते. या स्कूटरच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 64,100 रुपये इतकी आहे.

टीव्हीएस एनटॉर्क 125 (TVS Ntorq 125) – देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर्सच्या यादीत TVS Ntorq 125 या स्कूटरलादेखील स्थान मिळालं आहे. कंपनीने एप्रिलमध्ये या स्कूटरच्या 19,959 युनिट्सची विक्री केली आहे. या स्कूटरला तरुणांकडून चांगला प्रतिसात मिळतो. या स्कूटरची किंमत 71,095 ते 81,075 रुपयांच्या दरम्यान आहे.

इतर बातम्या

‘या’ तीन शहरांमध्ये उपलब्ध होणार बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर; आजपासून बुकिंग सुरु

सर्व इलेक्ट्रिक स्कूटरला मागे टाकेल ही सिंपल एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फिचर्सबद्दल

ब्लॅक, पिंक, लाइट ब्लूसह अनेक रंगांमध्ये Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, 499 रुपयांत बुकिंग करा

(Top 5 scooters as per highest number of sales in India)