Trex Electric Cycle | लवकरच भारतात इलेक्ट्रीक सायकलचे लाँचिंग, किंमत तब्बल….

| Updated on: Jan 11, 2021 | 7:56 PM

इलेक्ट्रीक सायकल खास देशातील रस्त्यांचा विचार करुन डिझाईन करण्यात आली आहे. (Trex Electric Cycle Launch India Soon)

Trex Electric Cycle | लवकरच भारतात इलेक्ट्रीक सायकलचे लाँचिंग, किंमत तब्बल....
Follow us on

पुणे : पुणे बेस्ड ईवी निर्माता कंपनी EMotorad ने लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रीक सायकल भारतात लाँच करणार आहे. T-Rex असे या नवीन इलेक्ट्रीक सायकलचे नाव असून लवकरची ही सायकल लाँच केली जाणार आहे. ही इलेक्ट्रीक सायकल खास देशातील रस्त्यांचा विचार करुन डिझाईन करण्यात आली आहे. (Trex Electric Cycle Launch India Soon)

T-Rex या सायकलची बॅटरी 36V 7.8Ah इतकी आहे. या सायकलची बॅटरी फक्त 4 तास चार्ज केल्यानंतर फूल होते. ही सायकल जानेवारी महिन्यात लाँच केली जाणार आहे. या इलेक्ट्रीक सायकलची किंमत 45 हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

EMotorad T-Rex 6061 ही इलेक्ट्रीक सायकल  अॅल्युमिनियम फ्रेम आणि फ्रंट सस्पेन्शनसोबत येते. या सायकलमध्ये LCD 866 डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा डिस्प्ले रिमोट सोबत येतो. यामुळे तुम्ही स्क्रीनवर एकावेळी अनेक काम करु शकता. इलेक्ट्रीक सायकलच्या रायडर्सला बॅटरी चार्ज इंडिकेटर, डिस्टेंस, डिस्टेंस युनिट, पेडल, असिस्ट लेवल यासारख्या अनेक गोष्टी स्क्रीनवर पाहता येणार आहे. T-Rex मध्ये LED हेडलाईट आणि टेललाईट देण्यात आले आहेत.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

T-Rex या इलेक्ट्रीक सायकलमध्ये सीएसटी टायर देण्यात आले असून त्यात अल्युमिनियम रिम्स आहेत. या इलेक्ट्रीक सायकलची पेडल असिस्टंट रेंज 60 किमी पर्यंत आहे. T-Rex या सायकलचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतका आहे. या इलेक्ट्रीक सायकलमध्ये ड्युल डिस्क ब्रेक आहे. या सायकलचे वजन फक्त 28.3 किलो आहे.

दरम्यान या सायकलचे फाऊंडर राजीब गंगोपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, EMX च्या लाँच इव्हेंडदरम्यान आम्हाला चांगले रिव्हियू मिळाले होते. त्यामुळे आम्ही T-Rex चे प्रोडक्शन सुरु केले होते. येत्या जानेवारी महिन्यात आम्ही ती सायकल लाँच करणार आहोत. (Trex Electric Cycle Launch India Soon)

संबंधित बातम्या : 

Honda Activa ला भारतीयांची सर्वाधिक पसंती, 20 वर्षात तब्बल 2.5 कोटी ग्राहक जोडले

भारतीय मार्केटमध्ये टाटाच्या ‘या’ छोट्या SUV चा धुमाकूळ, विक्रीमध्ये 21 टक्क्यांची वाढ