TVS iQube : तीन व्हेरिएंटमध्ये TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, सिंगल चार्जवर जबरदस्त रेंज, जाणून घ्या फीचर्स

| Updated on: May 19, 2022 | 9:59 AM

S व्हेरिएंटची किंमत 1,08,690 इतकी तर ST व्हेरिएंटची किंमत मात्र अद्याप समोर आलेली नाही.

TVS iQube : तीन व्हेरिएंटमध्ये TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, सिंगल चार्जवर जबरदस्त रेंज, जाणून घ्या फीचर्स
TVS iQube
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : पेट्रोलचे (Petrol) भाव गगनाला भिडल्याने भारतात इलेक्ट्रिक दुचाकींच्या (Electric bikes) मागणीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. परिणामी याचमुळे या सेगमेंटमधील दिग्गज ऑटो कंपन्या आपले नवनवीन प्रोडक्टवर काम करत आहेत. टीव्हीएस मोटर्सने भारतात आपला नवीन 2022 iQube इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. भारतात याची सुरुवातीची किंमत 98564 (ऑन रोड, दिल्ली) अशी आहे. ही स्कूटर तीन विविध व्हेरिएंटमध्ये (Variant) उपलब्ध आहे. यात, TVS iQube, iQube S आणि iQube ST यांचा समावेश आहे. यातील S व्हेरिएंटची किंमत 1,08,690 इतकी आहे. ST व्हेरिएंटची किंमत मात्र अद्याप समोर आलेली नाही. ग्राहक आता आईक्यूब आणि आईक्यूब एसची बुकिंग करु शकणार आहेत. दुसरीकडे आईक्यूब एसटीची प्री-बुकिंगही केली जात आहे. स्कूटरची डिलिव्हरीदेखील लगेच सुरु करण्यात आलेली आहे.

आईक्यूब आणि आईक्यूब एस इलक्ट्रिक स्कूटर दोन्ही स्कूटर हल्ली 33 शहरांमध्ये उपलब्ध आहेत. आणि लवकरच त्या 52 अतिरिक्त शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. 2022 च्या आईक्यूब मॉडेलचे डिझाईन तीन गोष्टींना लक्षात ठेवून बनविण्यात आले आहे. ज्यात, आवड, आराम आणि सिंपलिसिटीचा सहभाग आहे. ग्राहक रेंज, स्टोरेज, कलर आणि कनेक्टिव्हिटी फीचरच्या आधारावर ग्राहक या स्कूटरची निवड करु शकणार आहेत. या स्कूटरमध्ये ऑफ-बोर्ड चार्जर देण्यात आलेले आहेत. ज्यात, 650W, 950W आणि 1.5kW असे तीन पर्याय उपलब्ध राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा
  1. रेंज आणि स्पीड : स्कूटरचे बेस आणि एस व्हेरिएंट सिंगल चार्जवर 100 किमी रेंज देणार आहेत. तसेच टॉप ऑफ लाइन एसटी व्हर्जन 140 किमी रेंज देईल. तिन्ही व्हेंरिएंटची रेंज मागील मॉडेलच्या तुलनेत जास्त असणार आहे. आईक्यूब आणि आईक्यूब एस या दोन्हींची टॉप स्पीड 78 किंमी प्रतितास राहणार आहे. एसटी व्हेरिएंटाचा स्पीड 82 इतका राहणार आहे.
  2. आईक्यूब : 2022 टीव्हीएसच्या बेस व्हेरिएंट आईक्यूबमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असिस्टसोबत 5-इंच टीएफटी स्क्रीन देण्यात येणार आहे. आणि हे तीन कलर पर्यायांत उपलब्ध असणार आहे. हे व्हेरिएंट 3.4 kWh च्या टीव्हीएस मोटर डिझाईन केल्या गेलेल्या बॅटरीसोबत उपलब्ध होणार आहे.
  3. आईक्यूब एस : आईक्यूब एसमध्येही समान बॅटरी आहे. परंतु यात 7 इंच टीएफटी स्क्रीन देण्यात आले आहे. ज्यात, इंटरेक्शन, म्युझिक कंट्रोल, थीम पर्सनलाईझेशन, व्हीकल हेल्थ सोबत प्रोएक्टिव्ह नोटिफिकेशन्ससाठी पाच जॉयस्टिक देण्यात आले आहे.
  4. आईक्यूब एसटी : यात मोटर डिझाईन 5.1 kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. यात 7 इंच टीएफटी स्क्रीन देण्यात आले असून सोबत पाच जॉयस्टिक इंटरएक्टिव्हिटी, म्यूझिक कंट्रोल, व्हीकल हेल्थ, 4 जी टेलीमेटिक्स आणि ओटीए अपडेटसारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे.