AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

65 वर्ष जुन्या गाण्यावर रेखा यांचा भन्नाट डान्स, भरजरी लेहेंगा, रॉयल ज्वेलरी आणि दिलखेचक अदा… चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Rekha Dance Viral Video: कोण म्हणेल रेखा यांना 71 वर्षांच्या... 65 वर्ष जुन्या गाण्यावर थिरकल्या आणि सर्वांना अवाक् केलं... भरजरी लेहेंगा, रॉयल ज्वेलरी... त्यांच्या दिलखेचक अदांवर दर असंख्य चाहते फिदा... व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

65 वर्ष जुन्या गाण्यावर रेखा यांचा भन्नाट डान्स, भरजरी लेहेंगा, रॉयल ज्वेलरी आणि दिलखेचक अदा... चाहत्यांच्या खिळल्या नजरा
अभिनेत्री रेखा
| Updated on: Dec 16, 2025 | 8:36 AM
Share

Rekha Dance Viral Video: बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. रेखा यांना पाहिल्यानंतर असं कोणीच म्हणणार नाही की, त्या 71 वर्षांच्या आहे… वय म्हणजे फक्त एक आकडा आहे… असं म्हणतात ते रेखा यांच्याबाबतीत खरं आहे… आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेखा डान्स करताना दिसत आहेत. चाहत्यांना देखील रेखा यांचा खास अंदाज प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. रेखा यांनी वयाच्या 71 व्या वर्षी 65 वर्ष जुन्या गाण्यावर डान्स केला आहे.

डान्स स्टेप आणि अदांवर चाहते फिदा…

वयाच्या 71 व्या वर्षी देखील रेखा यांच्या डान्स स्टेप आणि चेहऱ्यावरीन हावभाव जबरदस्त आहेत… व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, बॉलिवूडमध्ये रेखा यांची जगा कोणीच घेऊ शकत नाही… रेखा यांनी ‘मोहे पनघट पे’ गाण्यावर डान्स केला… भरजरी लेहेंगा, रॉयल ज्वेलरी आणि दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले आहेत… रेखा यांच्या दमदार डान्सने चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे… असं म्हणायला देखील हरकत नाही…

‘मोहे पनघट पे’ गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुगल – ए – आजम’ सिनेमातील हे गाणं आजही अनेकांच्या पसंतीस उतरतं… या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हे गाणं जुनं असली तर चाहत्यांसाठी नवीन आहे…

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव…

रेखा यांच्या नृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक त्यांच्या नृत्याचे आणि शैलीचे सतत कौतुक करत आहेत. रेखा यांच्या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे… एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं, ‘वाह रेखा किती दिलखेच अंदाज आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘या वयात देखील इतका सुंदर डान्स…’

‘रेड सी ऑनर अवार्ड’ने अभिनेत्रीचा सन्मान

रेखा यांनी जेद्दाह येथील रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही हजेरी लावली, जिथे त्यांना रेड सी ऑनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यादरम्यान त्यांनी एक शायरी देखील प्रेक्षकांना ऐकवली. आईबद्दलची एक हृदयस्पर्शी कहाणी सांगितली. अभिनेत्री म्हणाली, “सिनेमांमुळे मी जिवंत आहे.”

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.