TVS ज्युपिटर 125 वा सुझुकी एक्सेस 125 कोणती बेस्ट ? किंमत, मायलेज, स्टोरेज आणि सेफ्टीत कोण नंबर वन ?
125cc scooters: भारतामध्ये 125 सीसी स्कूटर सेगमेंट की मागणी वाढत आहे आणि या श्रेणीमध्ये TVS ज्युपिटर 125 आणि सुझुकी एक्सेस 125 या दोन मॉडेलची सर्वात जास्त चर्चा आहे.

125cc scooter comparison: भारतीय दुचाकीच्या बाजारात टीव्हीएस ज्युपिटर १२५ आणि सुझुकी १२५ दोन्ही स्कूटर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या दोन्ही स्कूटरपैकी एकाची निवड करणे कठीण आहे. हे दोन्ही स्कूटर रोज दैनंदिन ग्राहकांचा विचार करुन तयार केले आहे. या दोन्ही स्कूटरमध्ये ब्रेकिंग, फिचर्स आणि किंमतीत खूप बदल झाला आहे. या बातमीत आपण या दोन्ही स्कूटरची तुलना करणार आहेत. यातील कोणती स्कूटर तुमच्यासाठी चांगली आहे हे पाहूयात….
कोणाची किंमत जास्त ?
या दोन्ही स्कूटरची किंमत वेगवेगळ्या मॉडेल नुसार वेगवेगळी आहे. यातील कोणती स्कूटर स्वस्त आहे हे पाहूयात….
TVS Jupiter 125: याची डिस्क (Disc) व्हेरिएंट सुरुवातीची किंमत सुमारे लगभग 81,100 (एक्स-शोरूम)आहे., तर याच्या टॉप
SmartXonnect ट्रिमची किंमत सुमारे 89,935 (एक्स-शोरूम)पर्यंत जाते.
Suzuki Access 125: याची किंमती रेंज थोडी जास्त आहे. याच्या स्टँडर्ड एडीशनची सुरुवातीची किंमत 82,185 पासून सुर होते. याच्या टॉप राईड कनेक्ट टीएफटी एबीएस एडिशनची किंमत सुमारे 1.01 लाख ( एक्स-शोरूम, दिल्ली ) पर्यंत जाते.
मायलेज कोणाचे जास्त ?
टीव्हीएस ज्युपिटर 125: कंपनीने या स्कूटरचा मायलेज 50 kmpl असल्याचा दावा केला आहे.
सुझुकी एक्सेस 125: कंपनीच्या दाव्यानुसार ही स्कूटर सुमारे 45 kmpl चा मायलेज देते.
मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही स्कूटरचे मायलेज थोडे कमी असण्याची शक्यता आहे.
कोणती जास्त सुरक्षित?
सुरक्षेच्या बाबत सर्वात मोठा फरक
सुझुकी एक्सेस 125 : याच्या राईड कनेक्ट एबीएस आणि राईड कनेक्ट टीएफटी एबीएस एडीशनमध्ये असली सिंगल चॅनल एबीएस (Single-Channel ABS) आहे. याच्या अन्य लोअर ट्रिम्समध्ये कंबाईंड ब्रेक सिस्टीम(CBS) दिलेली आहे.
टीव्हीएस ज्युपिटर 125 : याच्या डिस्क व्हेरिएंटमध्ये सिंक्रोनाईझ्ड ब्रेकिंग टेक्नोलॉजी (SBT – सिंक्रोनाईझ्ड ब्रेकिंग टेक्नोलॉजी) मिळते.जी विना एबीएस फ्रंट आणि रिअर ब्रेक्सला एक लिंक करुन काम करते.
यामुळे म्हटले जाऊ शकते जे खरेदीदार ओल्या रस्त्यांवर वा प्रचंड ट्रॅफीक वाल्या रस्त्यांवर जास्त राईड करतात त्यांच्यासाठी एक्सेसचा ABS व्हेरिएंट जास्त सुरक्षित सिद्ध होऊ शकतो.
स्टोरेज आणि टेक फिचर्स
अंडर-सीट स्टोरेज: सुझुकी एक्सेस 125 मध्ये 24.4 लिटरचा स्टोरेज स्पेस मिळतो, जो एक फुल फेस हेल्मेट ठेवण्यासाठी पुरेसा आहे. तर ज्युपिटर 125 मध्ये दावा केला आहे की स्टोरेज 33 लिटर आहे. टीव्हीएस उपयोगी जागेला वेगळ्या पद्धतीने मोजतो. यामुळे स्वत:च खात्री करणे उत्तम.
फिचर्स: Access 125 च्या टॉप व्हेरिएंटमध्ये 4.2 – इंचाचा कलर TFT क्लस्टर मिळतो. ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, नेव्हीगेशन आणि कॉल अलर्ट्स सपोर्ट करतो. दुसरीकडे Jupiter 125 मध्ये समी डिजिटल स्पीडोमीटर आणि मोबाईल चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.
लायटींग: दोन्ही स्कूटर्स बहुतांशी व्हेरिएंट्समध्ये एलईडी लायटिंग स्टँडर्ड म्हणून देण्यात आली आहे.