जेव्हा लाँच झाली देशाची पहिली स्वदेशी कार, मारुती 800 चा बाजार उठला, किंमत होती 2.59 लाख
रतन टाटा यांनी कमी पैशात जास्त जागा देणारी आणि पाच लोक आरामात बसतील अशी डिझेल इंजिनाची कार बाजारात उतरवून क्रांती केली. ही देशाची पहिली स्वदेशी कार ठरली....

स्वदेशी वस्तूंची एक वेगळीच ओळख असते. जेव्हा भारतीय रस्त्यावर आपल्या स्वॅगने राज्य करणाऱ्या कारचा विषय निघतो. तेव्हा Tata Indica चे नाव सर्वात पुढे येते. या १५ ऑगस्ट रोजी जेव्हा देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल,तेव्हा आत्मनिर्भर भारताच्या ऐतिहासिक गाथेला उजाळा देणे गरजेचे आहे. त्यावेळी भारताने कार निर्मितीत आपणही जगाच्या मागे नाही हे दाखवून दिले होते. नव्वदच्या दशकाची अखेर होत भारत आर्थिक स्वातंत्र्याचे नवे उड्डाण घेत होता. तेव्हा रतन टाटा यांनी देशाला एक अनमोल अशी भेट दिली.तेव्हा भारतीयांची स्वत:ची देशी कार बाजारात आणली तिचे नाव टाटा इंडिका होय…
टाटा इंडिका केवळ चार चाकी कार नव्हती तर भारताच्या आत्मविश्वास, इंजिनिअरिंगची ताकद आणि ‘मेड इन इंडिया’ च्या बुलंद निर्णयाचा असा जलवा होता. ज्याने विदेशी कंपन्यांचे धाबे दणादणे आहेत. या कारला केवळ 2.59 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरुम किंमतीवर लाँच केले गेले. चला तर भारताच्या पहिल्या संपूर्ण स्वदेशी पॅसेंजर कारच्या संदर्भात आज सर्वकाही जाणून घेऊयात..
भारताची ‘पहिली कार’
Indica च्या कहाणीची सुरुवात रतन टाटा यांच्या एका जिद्दी क्रांतीकारी विचारातून आली. ते एक अशी कार बनवू इच्छीत होते जी संपूर्ण हिंदूस्थानी असेल. त्यांना एक अशी कार हवी होती जी आकाराने विशाल एम्बेसेडर सारखी असेल, किंमतीत छोट्या मारुती ८०० सारखी असेल आणि ज्याचे मायलेज एका मोटारसायकलसारखे खिशावर भार देणार नसेल.
जेव्हा १९९८ च्या ऑटो एक्सपोमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आले, तेव्हा सारे जग पाहात राहिले. इटलीच्या डिझाईन फर्मने या कारची बॉडी तयार केली आणि पुण्याच्या टाटा प्लांटमध्ये याचे इंजिन तयार झाले. हा या गोष्टीचा पुरावा होता ती भारतीय मेंदू काही करु शकतो. मात्र, सुरुवातीला काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, परंतू टाटांनी हार मानली नाही. इंडिया V2 च्या रुपात या कारने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे ही कार मार्केटमध्ये प्रसिद्ध झाली.
इंडिकाच्या आधी कोण किंग ?
टाटा इंडिका कार येण्याच्या आधी भारतीय रस्त्यावर मोहोल वेगळा होता. त्यावेळी मारुजी सुझुकीचे एकछत्री राज्य होते. मारुती ८०० प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे पहिले प्रेम होती. जर झेन ( Zen) तिच्या चपळतेने तरुणांना आवडत होती. दुसरीकडे जुन्या जमान्याची निशाणी मानली जाणारी एंम्बेसेडर सरकारी कार्यालयाची शान होती. तर प्रीमीयर पद्मिनी (Fiat) कारचा जलवा टॅक्सी स्टँडवर दिसत होता.
मात्र या कारमध्ये एक कमतरता होती. एक या कार आतून एकदम छोट्या होत्या. लोकांना एक अशी मॉडर्न आणि स्वस्त कार हवी होती ज्यात संपूर्ण कुटुंब आरामात बसू शकेल. बाजारात एक मोठा स्पेस आणि दमदार डिझेल इंजिनाच्या कारची पोकळी होती. ही पोकळी भरण्यासाठी टाटा इंडिकाद्वारे आपल्या स्वदेशी अंदाजात जोरदार एण्ट्री मारली.
जेव्हा रस्त्यावर उतरली इंडिका..
टाटा इंडिका लाँच होताच भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एक नवी क्रांती आली. केवळ एकाच आठवड्यात या कारची १,१५,००० हून जास्त बुकींग्स नोंदली गेली. जो त्याकाळात एक विक्रम होता. याच्या येण्याने मोठे बदल पाहायला मिळाले.