कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

| Updated on: Jan 08, 2022 | 5:51 PM

तुम्ही तुमची कार एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रान्सफर किंवा विकत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेकांना त्यांच्या कारसाठी एनओसी (NOC - No Objection Certificate) आवश्यक आहे याची माहिती नसते.

कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : तुम्ही तुमची कार एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रान्सफर किंवा विकत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेकांना त्यांच्या कारसाठी एनओसी (NOC – No Objection Certificate) आवश्यक आहे याची माहिती नसते. बऱ्याचदा वाहनात इलेक्ट्रिक किट बसवलेले असल्याने वाहनासाठी ना हरकत प्रमाणपत्र (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) आवश्यक असते. ही एनओसी आरटीओ कार्यालयातून किंवा ऑनलाइन जारी केली जाऊ शकते. (Why NOC Needed for car? know easy online method to apply)

जर तुम्हाला एनओसीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. तुम्ही हे देखील लक्षात घ्यायला हवे की एनओसीची वैधता बँक आणि आरटीओमध्ये वेगवेगळी असते. याशिवाय तुम्ही अर्ज केल्यानंतर, साइट स्टेटसचाही मागोवा घेता येतो.

एनओसी का आवश्यक आहे?

जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा पत्ता बदलता तेव्हा NOC आवश्यक असते. NOC या गोष्टीचा पुरावा आहे की, तुमच्यावर कोणतेही कर्ज किंवा शुल्क नाही, कारचा रंग बदलण्यासाठी देखील NOC आवश्यक आहे. तसेच, जेव्हा कार मालक त्याचे वाहन विकण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्यांना RTO कडून NOC घेणे आवश्यक आहे.

एनओसीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (PUCC)
  • अप-टू-डेट पेमेंट रोड टॅक्स पावतीचे वैध दस्तऐवज
  • ऑटो इंश्योरन्स पॉलिसीची सर्टिफाइड फोटोकॉपी
  • व्हीकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची फोटोकॉपी
  • अर्ज (फॉर्म 28)
  • प्रिंट इंजिन नंबर आणि चेसिस नंबर
  • व्हीकल ओनर सिग्नेचर आयडेंटिफिकेशन

NOC साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम https://Parivahan.Gov.In/Parivahan/Hi च्या ऑफिशियल साईटवर जा.
  • नो ऑब्जक्शन सर्टिफिकेटसाठी अर्ज या पर्यायाची निवड करा
  • पुढील पेजवर विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.
  • आता व्हॅलिडेट रजिस्ट्रेशन नंबर/चेसिस नंबर निवडा.
  • आता रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका आणि ओटीपी जनरेट करा. Show Details वर क्लिक करा.
  • त्यानंतर वेबसाइट एक अॅप्लिकेशन फॉर्म जनरेट करेल. त्या फॉर्मवरील डेटा तपासा
  • कार विम्याचे डिटेल्स अर्जात समाविष्ट केलेले नसल्यास ते डिटेल्स अॅड करा.
  • नवीन RTO कोड टाका आणि save वर क्लिक करा.
  • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पेमेंट करा. पेमेंट पावतीची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काच्या पावतीसह संबंधित आरटीओमध्ये जा.

इतर बातम्या

नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

(Why NOC Needed for car? know easy online method to apply)