Banking Budget 2021: कर्ज बुडव्यांच्या वसुलीसाठी बॅड बँकेची घोषणा; कशी काम करणार बॅड बँक?

| Updated on: Feb 01, 2021 | 12:51 PM

बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कर्ज बुडव्यांकडून वसुली करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. (Banking Budget 2021: Sitharaman announces 'bad bank' to restructure NPAs)

Banking Budget 2021: कर्ज बुडव्यांच्या वसुलीसाठी बॅड बँकेची घोषणा; कशी काम करणार बॅड बँक?
Follow us on

नवी दिल्ली: बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कर्ज बुडव्यांकडून वसुली करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. सीताराम यांनी अर्थसंकल्पातून बॅड बँकेची घोषणा केली आहे. त्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. (Banking Budget 2021: Sitharaman announces ‘bad bank’ to restructure NPAs)

केंद्र सरकारने 2020-2021 या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला होता. त्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी बॅड बँक स्थापन करण्याची जोरदार मागणी केली होती. एनपीएची समस्या सोडवण्यासाठी बॅड बँकेची गरज आहे. कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेने अनेक नियमांमध्ये शिथिलता दिली होती. पुन्हा हे नियम लागू केल्यानंतर बँकांच्या बुडालेल्या कर्जांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संकटातून बँकांना बाहेर काढण्यासाठी बॅड बँके सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. यापूर्वी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही बॅड बँक सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात बॅड बँकची संकल्पना मांडण्यात आली आहे. या बॅड बँकेला डेव्हल्पेमेंट फायनान्स इन्सिट्यूशनच्या नावाने ओळखले जाणार आहे.

ऋणदात्यांकडून मागणी

सरकार गेल्या काही महिन्यांपासून बॅड बँकेवर विचार करत होती. लेंडर्सच्या बुडालेल्या कर्जाला घेऊन त्यातून समाधानकारक मार्ग काढण्यावर भर देणारी संस्था म्हणून बॅड बँकेकडे पाहिले जाते. ऋणदात्यांकडून गेल्या काही वर्षांपासून बॅड बँकेची मागणी केली जात होती. कठिण प्रसंगात त्यांच्या बुडालेल्या कर्जाचा ताण कमी व्हावा म्हणून त्यांच्याकडून ही मागणी करण्यात येत होती.

बॅड बँक म्हणजे काय?

ही एक आर्थिक संस्था आहे. बँकांचे बुडित खात्यात गेलेलं कर्ज स्वीकारून त्यातून सुनिश्चितपणे मार्ग काढण्याची प्रक्रिया बॅड बँकेकडून केली जाते. बँका आणि ऋणदात्यांकडूनही बॅड बँकेची मागणी करण्यात येत होती. बुडालेल्या कर्जाचा ताण कमी व्हावा यासाठी ही मागणी करण्यात येत होती. जगात फ्रान्स, पोर्तुगाल आणि स्पेनसारख्या देशात बॅड बँका कार्यरत आहेत. या वित्तीय संस्थेचं काम बॅड अॅसेट्सला गुड अॅसेट्समध्ये रुपांतरीत करण्याचं असतं. (Banking Budget 2021: Sitharaman announces ‘bad bank’ to restructure NPAs)

 

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : पुढील जनगणना डिजीटल होणार

Nirmala Sitharaman Saree | निर्मला सीतारमण यांच्या लूकने लक्ष वेधले, लाल साडी निवडण्याचे कारण काय?

Budget 2021: कोरोना काळात पाच मिनी बजेट एवढी आर्थिक मदत: निर्मला सीतारामन

(Banking Budget 2021: Sitharaman announces ‘bad bank’ to restructure NPAs)