नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात(Union Budget 2023) सोने -चांदीवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क (Import Tax) लावण्याचा प्रस्ताव येण्याचा अंदाज अखेर फोल ठरला. मोठा फटका न बसल्याने सोने-चांदीला येत्या काही दिवसांत ‘अच्छे दिन’ येण्याची आशा आहे. अर्थसंकल्पात सोन्यातील घटक आणि चांदीच्या उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. पंरतु, सोने-चांदीच्या आयात शुल्कात कोणतीही थेट वाढ करण्यात आलेली नाही. त्याचा परिणाम लागलीच वायदे बाजारात दिसला. सराफा बाजारातही त्याचा परिणाम दिसून येईल. भारतीय फ्युचर्स मार्केट मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याची किंमत (Gold Price Today) जवळपास 58 हजारांवर पोहचली आहे. तर चांदीने मरगळ झटकली आहे. चांदीचा भाव (Silver Price) 70 हजारांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने-चांदीविषयी केलेल्या घोषणा आणि त्याच्या परिणामाचा दीर्घकालीन परिणाम दिसून येईल.
गोल्ड कम्पोनेट जसे की, अनरफ आणि सेमी उत्पादित स्वरुपातील गोल्ड कम्पोनेटवरील आयात शुल्कात वाढ झाली. आयात शुल्क 7.5 टक्क्यांहून 10 टक्के करण्यात आले आहे.
चांदी डोर अथवा सिल्व्हर रॉड यावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. आयात शुल्क 6.1 टक्क्यांहून 10 टक्के करण्यात आले आहे.
गोल्ड सिल्व्हर आर्टिकल्समध्ये सोने आणि चांदीची फ्रेम, यासंबंधीत इतर सामानावरील आयात शुल्क 20 ते 25 टक्के करण्यात आले आहे.
बजेटमधील घोषणेनंतर सोन्याच्या किंमतीत जोरदार तेजी दिसून येत आहे. आकड्यानुसार, त्यात 665 रुपयांची वाढ होऊन सोने प्रति 10 ग्रॅम 57855 रुपयांवर पोहचले आहे.
व्यापारी सत्रात सोन्याचा भाव 57950 रुपयांसह सर्वकालीन उच्चांकावर पोहचले आहे.
आज सोन्याचा भाव 57150 रुपयांवर उघडला. काल हा भाव 57190 रुपये होता.
चांदीच्या किंमतीत वायदे बाजारात 1 हजार रुपयांची तेजी दिसून आली. चांदीने मरगळ झटकली. चांदीच्या भावाने जोरदार उसळी घेतली आहे.
दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी चांदीच्या किंमतीत 1159 रुपये प्रति किलोची तेजी दिसून आली. चांदीचा भाव 69,988 रुपये प्रति किलोवर व्यापार करत होता.
व्यापारी सत्रात 70,152 रुपये प्रति किलोसह चांदीने उच्चांक गाठला. आज चांदीचा भाव 68,754 रुपये प्रति किलोसह उघडला. त्यानंतर 68,613 रुपयांपर्यंत भावात घसरण दिसून आली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन(IBJA) नुसार, सराफा बाजारातील सोने-चांदीचा भाव जाहीर करण्यात आला. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याने उसळी घेतली. हा भाव 57,426 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावला. 999 शुद्ध चांदी महागली. प्रति किलो हा भाव 68,794 रुपये होता.