Budget 2021: बजेटचं भाषण संपताच सोने 1200 रुपयाने स्वस्त; जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव

| Updated on: Feb 01, 2021 | 2:29 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. (Budget 2021: gold becomes cheaper at the end of budget)

Budget 2021: बजेटचं भाषण संपताच सोने 1200 रुपयाने स्वस्त; जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे सोनं-ंचांदी स्वस्त होणार असून सीतारामन यांच्या या घोषणेचा परिणाम तात्काळ सराफा बाजारात पाहायलाही मिळाला आहे. सीतारामन यांचं भाषण संपताच सोन्याच्या किंमती 1200 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Budget 2021: gold becomes cheaper at the end of budget)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर अर्थसंकल्प संपताच सोन्याचे वायदे भाव घसरले आहेत. सोने आणि चांदीची कस्टमड्युटी अधिक तार्किक करण्यात येत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं होतं. त्यांनी सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करून 2.5 टक्के केलं होतं. आज दुपारी 1 वाजता दहा ग्रॅम सोन्याचा वायदा भाव 1286 रुपयाने घटला. वायदे भावात 1286 रुपयाने घसरण झाल्याने दहा ग्रॅम सोन्याची फ्यूचर प्राईस 49, 717 रुपये एवढी झाली आहे. तर, चांदीचे भाव किंचित वाढले आहेत. चांदीच्या वायदे भावात 3164 रुपयाने वाढ झाली आहे. सध्या एक किलो चांदीची वायदा भाव 72870 रुपयांवर गेला आहे.

बजेटपूर्वी सोन्या-चांदीचे भाव

अर्थसंकल्पापूर्वीच सोने आणि चांदीच्या भावात वाढ दिसत होती. एमसीएक्सवर डिलिव्हरी सोन्याच्या भावात 274 रुपयाने वाढ होऊन हा दर प्रति दहा ग्रॅम 49370 वर पोहोचला. सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी सोन्याच्या दरात 185 रुपयाने वाढ झाली होती. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा भाव 49281 वर पोहोचला होता. सध्या चांदीच्या डिलिव्हरीत वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी एमसीएक्सवर मार्च डिलिव्हरी चांदीचा भाव 1944 रुपयाने वाढून हा भाव प्रति किलोला 71650 रुपये एवढा झाला होता. सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी चांदीचा भाव 4167वरून 73873 रुपये प्रति किलोग्रॅमला गेला होता. मे डिलिव्हरीवाली चांदी सध्या 4048 रुपयांवरून 74789 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. (Budget 2021: gold becomes cheaper at the end of budget)

 

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE :पेट्रोलची शंभरी निश्चित, डिझेलही भडकणार, अर्थमंत्र्यांची सेसची मोठी घोषणा

Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार

Petrol & Diesel: पेट्रोलची शंभरी निश्चित, डिझेलही भडकणार, अर्थमंत्र्यांची सेसची मोठी घोषणा

(Budget 2021: gold becomes cheaper at the end of budget)