AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्याच्या घडीला LIC कडे तब्बल 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. | LIC IPO

Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार
एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्याच्या घडीला LIC कडे तब्बल 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
| Updated on: Feb 01, 2021 | 1:14 PM
Share

नवी दिल्ली: सर्वात मोठी विमा कंपनी -भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा (IPO) निर्गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला यांनी भारत सरकार निर्गुंतवणीकरण करणाऱ्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असे निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले. (Government to bring LIC IPO this year)

LIC च्या प्रशासकीय नियमांत बदल करण्यासाठी विधेयक

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्याच्या घडीला LIC कडे तब्बल 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. बाजारपेठेत IPO आणण्यासाठी केंद्र सरकारला LIC च्या प्रशासकीय नियमांत काही बदल करावे लागतील. त्यानंतरच केंद्र सरकारला एलआयसीमधील हिस्सेदारी विकता येईल. त्यामुळे आता केंद्र सरकार यासाठी संसदेत सुधारणा विधेयक मांडणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली.

मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार

आयडीबीआय बँकेसोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारनं प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. व्यवसाय करण्याच्या सोयीसाठी स्वतंत्र प्रशासकीय रचना करण्यात येईल. जेणेकरून कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसायात कोणतीही अडचण येणार नाही. गुंतवणूकदारांसाठी एक नवीन तरतूद करण्यात आलीय. विमा क्षेत्रात एफडीआय 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2022 आर्थिक वर्षासाठी 20 हजार कोटी सरकारी बँकांना देण्यात येणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

कर्ज बुडव्यांच्या वसुलीसाठी बॅड बँकेची घोषणा; कशी काम करणार बॅड बँक?

बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कर्ज बुडव्यांकडून वसुली करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. सीताराम यांनी अर्थसंकल्पातून बॅड बँकेची घोषणा केली आहे. त्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात बॅड बँकची संकल्पना मांडण्यात आली आहे. या बॅड बँकेला डेव्हल्पेमेंट फायनान्स इन्सिट्यूशनच्या नावाने ओळखले जाणार आहे.

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : नव्या शैक्षणिक धोरणाचं देशात स्वागत, स्वामित्व योजना देशभरात

मोठी बातमी! मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार

(Government to bring LIC IPO this year)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.