Budget 2026 : बजेटसाठी देश सज्ज, यंदा काय असणार खास ? घरबसल्या इथे LIVE पाहता येणार अर्थसंकल्प

Union Budget 2026 : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी बजेट सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेट सादर करण्याची ही त्यांची 9 वी वेळ आहे. देशासाठी नव्या घोषणा काय होणार, टॅक्स स्लॅब बदलणार की नाही, कोणत्या गोष्टी स्वस्त होणार, काय महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Budget 2026 : बजेटसाठी देश सज्ज, यंदा काय असणार खास ? घरबसल्या इथे LIVE पाहता येणार अर्थसंकल्प
बजेट 2026
| Updated on: Jan 30, 2026 | 1:17 PM

2026 या वर्षातील आर्थिक इव्हेंट म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प 2026 (Union Budget 2026) आता खूप जवळ आलं आहे. काल 29 जानेवारी रोजी संसदेच्या पटलावर आर्थितक सर्वेक्षण सादर झाला. तर येत्या रविवारी, म्हणजेच 1 फेब्रुवार रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा लेखाजोखा सादर करतील. हे बजेट अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे.हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प तर आहेच. पण यावेळनिर्मला सीतारमण यांच्या नावावर सलग नववे अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही असेल.

येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026-27) सादर करतील. त्यांचं भाषण सकाळी 11 वाजता सुरू होईल. हे बजेट येत्या आर्थिक वर्षात सरकारच्या आर्थिक धोरणांची दिशा ठरवेल.

पहिल्यांदाच रविवारी सादर होणार बजेट

साधारणत: दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आठवड्यातील एक कामकाजाचा दिवस निवडला जातो, परंतु भारताच्या इतिहासात प्रथमच, यंदाचं बजेट हे रविवारी ( 1फेब्रुवारी) सादर केलं जाईल. अर्थमंत्री सकाळी 11 वाजता संसदेत आपले भाषण सुरू करतील. 2017 पूर्वी, फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जात असे, परंतु माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही परंपरा बदलून बजेट सादर करण्याचा दिवस 1 फेब्रुवारी रोजी केला. या अर्थसंकल्पाकडून देशभरातील विविध क्षेत्रांना,सेक्टर्सना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाकडे लागले आहे.

बजेटचं पूर्ण शेड्यूल

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 28 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. हे अधिवेशन दोन टप्प्यात

पहिला टप्पा 28 जानेवारी रोजी सुरू झाला आणि 13 फेब्रुवारी 2026 रोजी संपेल. तर अधिवेशनाचा दुसरा टप्पा 9 मार्च रोजी सुरू होईल आणि 2 एप्रिल 2026 रोजी संपेल. विविध संसदीय समित्यांना अर्थसंकल्पीय घोषणा आणि मंत्रालयांच्या मागण्यांवर तपशीलवार चर्चा करण्यासाठी दरम्यान एक मोठा ब्रेक आवश्यक आहे.

बजेटचं लाइव्ह कव्हरेज कुठे पहाल ?

बजेट कुठे पाहावे याबद्दल लोक अनेकदा गोंधळलेले असतात. जर तुम्हाला यंदाचं म्हणजेच बजेट 026 हे कुठे लाईव्ह पाहता येईल असा प्रश्न पडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तसेच, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याची अचूक तपशीलवार माहिती तुम्हाला कुठून मिळेल ?

टीव्ही9 मराठीवर तुम्हाला बजेटचे प्रत्येक तपशील अचूक मिळतील.

टीव्ही9 मराठी

बजेटची कॉपी कुठून डाऊनलोड करायची ?

अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर सरकार हे बजेट लगेचच डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देते. तुम्ही indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन बजेट डाउनलोड करू शकता. याशिवाय, सर्व सरकारच्या ‘युनियन बजेट मोबाइल ॲप’ वर सर्व कागदपत्रं पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असतील.