Budget 2022: देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज, जुमलेबाजी नको; बजेटपूर्वीच काँग्रेसची टीका

| Updated on: Feb 01, 2022 | 10:52 AM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. देश दोन वर्षापासून कोरोना संकटाशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Budget 2022: देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज, जुमलेबाजी नको; बजेटपूर्वीच काँग्रेसची टीका
देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज, जुमलेबाजी नको; बजेटपूर्वीच काँग्रेसची टीका
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ( Nirmala Sitharaman) या थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. देश दोन वर्षापासून कोरोना (corona) संकटाशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अर्थसंकल्पात सर्व सामान्य नागरिक आणि करदात्यांना काय मिळणार? अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळणार का? भविष्यातील आर्थिक धोरण काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, बजेट सादर होण्यास अवघा तासभर उरलेला असतानाच काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज आहे. जुमलेबाजीची नाही, असा टोला काँग्रेसने (congress)लगावला आहे. तर, दुसरीकडे निर्मला सीतारामण या संसदेत पोहोचल्या. त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार असून त्यात बजेटला मंजुरी देण्यात येणार आहे.

आज सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसने ट्विट करून काँग्रेसवर टीका केली आहे. देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज आहे. जुमलेबाज धोरणांची नाही, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. तसेच या सोबत जन की बात हा हॅशटॅगही वापरला आहे. दरम्यान, बजेटच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामण आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी बजेट सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी अर्थ मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.

कराड यांची पूजा

बजेट सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आपल्या निवासस्थानी पूजा अर्चा केली. कराड यांनी संत भगवानबाबा आणि विठ्ठलाच्या फोटोंना हार घालून पूजा केली.

शेअर बाजाराची उसळी

बजेट सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात सेन्सेक्सने उसळी घेतली आहे. सेन्सेक्समध्ये 650 अंकाची वाढ घेऊनच शेअर बाजार उघडला. तर निफ्टीमध्ये 150 अंकाची वाढ झाली आहे.

 

काय होतं सीतारामण यांचं शेड्यूल

सकाळी 8.40 वाजता नॉर्थ ब्लॉकमधून निघाल्या

9 वाजता नॉर्थ ब्लॉकच्या गेट नंबर 2च्या बाहेर फोटो सेशन केलं.

9 वाजून 25 मिनिटांनी राष्ट्रपती भवानात राष्ट्रपतींची भेट घेतली.

10 वाजता संसदेत पोहोचल्या

10 वाजून 10 मिनिटांनी कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थिती

11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार

3 वाजून 45 मिनिटांनी पत्रकार परिषदेला संबोधित करणार

 

संबंधित बातम्या:

अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प आज होणार सादर, कुठल्या क्षेत्राला मिळणार दिलासा याकडे सर्वांचे लक्ष…

Budget 2022 : मनमोहन Vs मोदी सरकार, कोणाच्या काळात करदात्याला दिलासा, कोणामुळे रिकामा झाला खिसा?

Budget 2022 – कधी पटलावर येणार अर्थसंकल्प… तारीख, वेळ आणि कुठे पाहता येणार अर्थसंकल्प…जाणून घ्या एका क्लिकवर