Budget Session 2024 | बजेट 2024 कसं असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महत्त्वाचे संकेत

Budget Session 2024 | उद्या अर्थसंकल्प 2024 सादर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन बजेट 2024 सादर करतील. निवडणुकीच्या आधीच हे बजेट असल्याने सर्वसामन्य जनतेला भरपूर अपेक्षा आहेत.

Budget Session 2024 | बजेट 2024 कसं असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महत्त्वाचे संकेत
Budget 2024
| Updated on: Jan 31, 2024 | 11:00 AM

PM Modi on budget 2024 | आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. “तुम्हाला सर्वांना 2024 साठी राम-राम. आम्ही संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं. 26 जानेवारीला कर्तव्य पथावर नारी शक्ती आणि नारी शौर्य पाहिलं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “मागच्या 10 वर्षात ज्याला जे सूचलं, त्याने त्या पद्धतीने संसदेत काम केलं. गोंधळ घालण हा ज्या खासदारांना स्वभाव बनला आहे, ते लोकशाही मुल्यांच नुकसान करतायत. असे खासदार शेवटच्या अधिवेशनात जरुर आत्मपरिक्षण करतील” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“निवडणुका जवळ असताना पूर्ण बजेट मांडल जात नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर पूर्ण बजेट मांडू” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “आपल्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मार्गदर्शन करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम बजेट सादर करतील. नारी शक्तीची ताकत दिसेल” असं मोदी म्हणाले.

‘त्याची नोंद इतिहासात ठेवली जाईल’

“विरोधकांनी कठोर शब्दात टीका केली असली तरी, त्याची नोंद इतिहासात ठेवली जाईल. पण ज्यांनी फक्त नकारात्मक विचार दाखवले त्यांची नोंद कोणी घेणार नाही” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.