Budget 2022 : आता पर्यंत कोण कोणत्या अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं? कुणाला संधी मिळाली नाही?

Budget 2022 : आता पर्यंत कोण कोणत्या अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं? कुणाला संधी मिळाली नाही?
budget 2022

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मनमोहन सिंग 1991-96 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 27, 2022 | 2:20 PM

Budget 2022 : यंदाही देशात कोरोना काळात(Corona Period) अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. कोरोना काळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022-23) सादर करणार आहेत. दरवर्षी येणारा हा अर्थसंकल्प कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा असतो. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये (Tax Slab) कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र यंदा महागाई आणि महामारी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या सर्वसामान्य चाकरमान्यांना कर सवलतची मर्यादा वाढवून हवी आहे.सरकार यंदा मोठी घोषणा करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. देशातील प्रत्येक घटकाची नजर बजेटवर खिळलेली असते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 जुलै 2019 रोजी पहिल्यांदा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. मग सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चाला जाणून घेऊयात आतापर्यंत सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केले आहेत

पी चिदंबरम (P. Chidambaram)

मोरारजी देसाई यांच्यानंतर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सर्वाधिक 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. पी. चिदंबरम हे पंतप्रधानांच्या कार्यकाळात 4 वेळा अर्थमंत्री राहिले आहेत.

प्रणव मुखर्जींसह या नेत्यांनी 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला.

पी. चिदंबरम यांच्यानंतर प्रणव मुखर्जी, यशवंत सिन्हा, वाय. बी. चव्हाण आणि सीडी देशमुख यांनीही तितक्याच वेळा म्हणजे 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला.

मनमोहन सिंह (Manmohan Singh)

पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या मनमोहन सिंग यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. 1991- 96 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. या काळात मनमोहन सिंग यांनी देशात मोठे आर्थिक बदल केले आणि अर्थव्यवस्थेची ढासळती स्थिती हाताळली. मुक्त अर्थव्यवस्थेचा नारा याच काळात देण्यात आला. परदेशी कंपन्यांसाठी बंद असलेली देशाची कवाडे उघडी करण्यात आली. भारताने जागतिक स्पर्धेत उडी घेतली.

अरुण जेटली (Arun Jaitley)

2014-18 दरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5 वेळा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पातील सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रमही दिवंगत अरुण जेटली यांच्या नावावर आहे. अरुण जेटली यांनी 2014 मध्ये 2.5 तासांचं अर्थसंकल्पीय भाषण दिलं होतं.

आर वेंकटरामन (R. Venkatraman)

1980-82 साली आर. वेंकटरामन इंदिरा गांधी सरकारमध्ये अर्थमंत्री होते, त्यांनी 3 वेळा अर्थसंकल्प सादर केला. एच. एम. पटेल यांनी 3 वेळा अर्थसंकल्पही सादर केला आहे. मोरारजी देसाई सरकारमध्ये एच. एम. पटेल अर्थमंत्री होते.

या अर्थमंत्र्यांनी दोन वेळा अर्थसंकल्प सादर केला.

जसवंत सिंह, वी पी सिंह, सी सुब्रह्मण्यम, जॉन मथाई, आर के शंकमुखम चेट्टी यांनी प्रत्येकी दोन वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

या नेत्यांनी एकदा अर्थसंकल्प सादर केला.

जवाहरलाल नेहरू, एन. डी. तिवारी, मधू दंडवते, इंदिरा गांधी, राजीव गांधी, चरणसिंग (चौधरी चरणसिंग), एस. बी. चव्हाण (शंकरराव भावराव चव्हाण), सचिंद्र चौधरी यांनी अर्थमंत्रीपदी म्हणून एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडला आहे.

संबंधित बातम्या :

Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!

Budget 2022: यंदाच्या बजेटमध्ये सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानाची व्याप्ती वाढवणार? जाणून घ्या महत्वाचे मुद्दे!

Home Loan Tax Rebate: स्वप्नातील घराला कर सवलतीचा नजराणा, 5 लाखांपर्यंत मिळू शकते कर सवलत


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें